How to update Aadhaar Card online for free : आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. आधार कार्डचा १२ अंकी युनिक आयडी नंबर बँक अकाऊंटपासून ते अगदी कॉलेजमधील प्रवेशासाठी सर्वच ठिकाणी फारचं आवश्यक असतो. तुमच्यातील अनेकांना आधार कार्ड काढून बरीच वर्ष झाली असतील. २०१६ च्या नियमानुसार व्यक्तींनी त्यांच्या आधार नोंदणी तारखेपासून दर दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट केले पाहिजे. हे ५ आणि १५ वर्षांच्या मुलाच्या ब्लू आधार कार्डवर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठीदेखील लागू होते. तर आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने अलीकडेच मोफत आधार कार्ड ( Aadhaar Card) अपडेट करण्याची व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची अंतिम मुदत १४ जून होती ती आता १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधार कार्डवरील कोणती माहिती ऑनलाइन अपडेट केली जाऊ शकते?

नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता, रिलेशनशिप स्टेटस, इन्फॉर्मेशन शेरिंग कॉन्सेंट आदी गोष्टी तुम्ही अपडेट करू शकता.

हेही वाचा…How to undo Gmail : एकदा पाठवलेला मेल आता ‘Undo’ करता येणार; फक्त ‘या’ चार स्टेप्स फॉलो करा

१४ सप्टेंबरपूर्वी आधार कार्ड (Aadhaar Card) अपडेट कसा कराल?

अधिकृत वेबसाईटला भेट द्या : सगळ्यात पहिला UIDAI म्हणजे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटवर uidai.gov.in वर जा. दिलेल्या पर्यायांमधून तुमच्या सोयीनुसार भाषा निवडा.

ॲक्सेस अपडेट फिचर : ‘माय आधार’ टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘अपडेट युवर आधार’ हा पर्याय निवडा.

अपडेटसह पुढे जा : तुम्हाला ‘अपडेट आधार डिटेल्स (ऑनलाइन)’ पेजवर नेले जाईल. प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘Document Update’ वर क्लिक करा.

युआयडी क्रमांक टाका : तुमचा युआयडी क्रमांक, कॅप्चा व्हेरिफिकेशन कोड तिथे टाका. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) येण्यासाठी ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.

लॉग इन करा : ओटीपी मिळाल्यानंतर लॉग इन करा. ओटीपी एंटर करा व अकाउंट एक्सेस करण्यासाठी ‘लॉग इन’ वर क्लिक करा.

अपडेटेड माहिती भरा : तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे ते निवडा व नवीन माहिती अचूक भरून घ्या.

डॉक्युमेंट सबमिट करा : आवश्यक बदल केल्यानंतर, ‘सबमिट’ वर क्लिक करा. तुमची माहिती अपडेट करण्यासाठी आवश्यक असलेले स्कॅन डॉक्युमेंट्स अपलोड करा.

रिक्वेस्ट नंबर प्राप्त होईल : नंतर ‘Submit Update Request’ वर क्लिक करा. सबमिशन केल्यावर, तुम्हाला एसएमएसद्वारे अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) प्राप्त होईल; जो तुम्ही अपडेट ट्रॅक करण्यासाठी वापरू शकता.

ओरिजिनल कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करून, १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत तुम्हाला myAadhaar पोर्टलवर विनामूल्य आधार कार्ड (Aadhaar Card) अपडेट करता येईल. त्यानंतर मात्र तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २५ रुपये आणि ऑफलाइनसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागतील. फोटो किंवा फिंगरप्रिंट्स यांसारख्या बायोमेट्रिक फीचर्स अपडेट करण्यासाठी मात्र तुम्हाला आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar card free update the unique identification authority of india has extended the deadline for updating aadhaar cards and uploading documents online to 14 september 2024 asp