Change Photo in Aadhaar Card: आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाचे ओळख पुरावा कागदपत्रांपैकी एक आहे. काम सरकारी असो वा खाजगी, आधार कार्डची सर्वत्र गरज असते. पण, आधार कार्डवरील फोटो खराब आहे अशी अनेकांची तक्रार असते. आपण कितीही चांगला कॅमेरा वापरुन स्वतःचे सुंदर फोटो काढतो पण एका ठिकाणी मात्र आपला फोटो कधीच चांगला राहत नाही ते म्हणजे आपलं आधार कार्ड. तुम्हालाही आधार कार्डवरील फोटो आवडला नसेल तर तो तुम्ही बदलू शकता. यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. ऑनलाइन माध्यमातून आधार कार्डचा फोटो कसा बदलायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
तुम्हाला तुमच्या आधारचा फोटो बदलून त्याच्या जागी दुसरी आणि चांगली इमेज द्यायची असेल, तर तुम्हाला आता ही सुविधा ऑनलाइन दिली जात आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मदतीने तुम्ही आधारमध्ये नाव, मोबाईल नंबर, पत्ता, लिंग, जन्मतारीख आणि फोटो बदलू शकता. जर तुम्हाला या प्रक्रियेबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
(हे ही वाचा: महागड्या फोन्सना स्वस्तात खरेदी करण्याचा चान्स! ‘इथे’ मिळतेय सर्वात मोठी डील, लगेच पाहा वेळ फारच कमी!)
आधारमध्ये फोटो अपडेट करण्याची सर्वात सोपी प्रक्रिया
- आधार कार्डमध्ये फोटो अपडेट करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावे लागेल.
- आता तुम्हाला आधार विभागात जाऊन आधार नोंदणी फॉर्म अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
- आता तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि तो कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्रात सबमिट करावा लागेल.
- येथे तुमचे बायोमेट्रिक तपशील घेतले आहेत.
- आता तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १०० रुपये जमा करावे लागतील.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल ज्यामध्ये URL दिली जाईल.
- तुम्ही हे URN वापरून अपडेट तपासू शकता.
- यानंतर तुमच्या आधारची इमेज अपडेट होईल.