भारतीय नागरिक आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नसतानाही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून आधार कार्ड डाउनलोड करू शकतात. आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या सरकारी संस्थेचे नाव UIDAI आहे, त्यांच्या वेबसाइटवर जाऊन आधारशी संबंधित काम घरबसल्या करता येते.
आधार कार्ड हे बँक खाते उघडणे, वाहन नोंदणी, गृहकर्ज मिळवणे यासाठीही आवश्यक कागदपत्र बनलेले आहे. त्यातच आता ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे आधार कार्ड वापरणे खूप महत्त्वाचे आहे.
यापूर्वी आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक होते. मात्र आता तुमचा नोंदणीकृत फोन नंबर तुमच्या जवळपास नसला तरीही आधार कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते. कसे ते संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.
आधार कार्ड कसे डाउनलोड करावे
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवरून ‘माय आधार’ पर्याय निवडा. त्यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला दिलेल्या मेनूवर क्लिक करा.
‘माय आधार’ वर दिलेल्या ऑर्डर आधार रिप्रिंटवर क्लिक करा.
यानंतर आधार क्रमांक किंवा आभासी ओळख क्रमांक (VID) टाका.
त्यानंतर कॅप्चा टाका आणि पुढे जा.
मोबाईल नंबरशिवाय कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ‘माय मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही’ (‘My Mobile number is not registered) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
पर्यायी क्रमांकावर OTP येईल, तो प्रविष्ट केल्यानंतरच वापरकर्त्याला प्रीव्यू करण्याचा पर्याय मिळेल.