इंस्टाग्राम युजर्सना मंगळवारी रात्री अनेक व्यत्ययांचा सामना करावा लागला. युजर्सना त्यांचे प्रोफाइल पेज लोड करण्यात आणि आपले होम फीड स्क्रोल करण्यात व्यत्यय आले. यानंतर युजर्सनी ट्विटरवर अनेक मीम्स आणि जोक्स शेअर केले आणि #Instagramdown हा हॅशटॅग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करू लागला. यावेळी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग इलेक्ट्रिक गॅझेट्स आणि वाय-फाय किंवा मोबाइल डेटा फिक्स करत असल्याचे मीम्स देखील समोर आले.
एका रिअल-टाइम आउटेज मॉनिटरिंग साइट डाउन डिटेक्टरने सांगितले की युजर्ससाठी इंस्टाग्राम सुमारे एक तास बंद होते. दिल्ली, मुंबई, लखनऊ, इंदोर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि इतर प्रमुख शहरांमध्ये, युजर्सनी इंस्टाग्राम रात्री ११:३० वाजेपर्यंत डाउन असल्याचे सांगितले.
UPI Fraud : सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी पाच सोप्या स्टेप्स; आजच करा फॉलो
भारतीय रेल्वेने बदलले तिकीट बुकिंगचे नियम; आता ग्राहकांना होणार अधिक फायदा! जाणून घ्या तपशील
Netflix ला बसला जबरदस्त धक्का! गेल्या ३ महिन्यात गमावले ‘इतके’ ग्राहक; जाणून घ्या कारण
डाउन डिटेक्टरनुसार, रात्री १० नंतर नोंदवलेल्या डाऊनची संख्या ४४६ वर गेली होती. तसेच, या आउटेजचा सर्व वापरकर्त्यांवर परिणाम झाला नाही कारण काही नेटिझन्सनी सांगितले की त्यांचे प्रोफाइल आणि फीड पूर्णपणे लोड होत आहेत.
इंस्टाग्रामने अद्याप आउटेज आणि त्रुटीच्या कारणाची पुष्टी केलेली नाही. या महिन्याच्या सुरुवातीला इंस्टाग्रामने अशाच प्रकारची आउटेज नोंदवली आणि ट्विटरवर मीम्सचा पूर आला होता. केवळ इंस्टाग्रामच नाही तर फेसबुक, स्पॉटिफाई, डिस्कॉर्ड आणि टेलिग्राम वापरकर्त्यांनाही देखील समस्यांचा सामना करावा लागला आहे.