Apple Iphone Battery Life : ॲपल युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली आहे, त्यामुळे कंपनी नवनवीन फीचर्स आणि बॅटरी लाइफवर काम करीत असते. पण, जसजसा मोबाइल जुना होतो तसतशी बॅटरीची लाइफ कमी होऊ लागते. जर तुम्हीही आयफोन युजर्स असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोनची बॅटरी लाइफ सुधारण्यासाठी काही टिप्स कंपनीने सांगितल्या आहेत. त्याबद्दल या लेखातून अधिक जाणून घेऊ…
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात पाच टिप्स देण्यात आल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे –
१. तुमचा आयफोन सतत अपडेट करत राहा –
तुमच्या आयफोनला नवीन iOS आवृत्तीसह अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अपडेट केवळ फोनमध्ये नवनवीन फीचर्स आणत नाहीत. तर महत्त्वपूर्ण Fixes देखील आणतात ; ज्यामुळे बॅटरी लाइफवर परिणाम होतो. तुमचा iPhone iOS च्या नवीन आवृत्तीसह अपडेट करून, तुम्ही बॅटरी लाइफ आणि एकूण डिव्हाइस कार्यक्षमता ऑप्टिमाइझ करू शकता. ॲपलने नवीन अपडेट्सचा लाभ घेण्यासाठी तुमच्या आयफोनचे सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करण्याची अत्यंत गरज आहे.
२. तुमचा आयफोन कूल (cool ) ठेवा :
टेक जायंटच्या म्हणण्यानुसार iPhones 16° आणि 22°C (62° ते 72°F) दरम्यानच्या तापमानात चांगले काम करू शकते. त्यामुळे तुम्ही डिव्हाइसचे तापमान 35°C (95°F) पेक्षा जास्त ठेवल्यास बॅटरी क्षमतेचे कायमचे नुकसान होऊ शकते. याउलट, अतिशय थंड वातावरणात तुमचे डिव्हाइस वापरल्याने बॅटरी लाइफ टिकून राहते. याव्यतिरिक्त बॅटरी लाइफचे नुकसान टाळण्यासाठी डिव्हाइस 32°C (90°F) खाली थंड, कोरड्या वातावरणात ठेवा.
३. चार्जिंग करताना फोन कव्हर (case) काढा :
काही आयफोन चार्जिंगदरम्यान गरम होतात ; ज्यामुळे बॅटरीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चार्जिंगदरम्यान तुमचे डिव्हाइस गरम झाल्याचे तुमच्या लक्षात आलं की, लगेच तुमच्या आयफोनचे कव्हर काढून बाजूला ठेवा ; असा सल्ला कंपनी देते आहे. असे केल्याने तुमच्या बॅटरची लाइफ दीर्घकाळ टिकून राहू शकते.
४. तुमचा फोन किमान अर्धा चार्ज करून ठेवा :
तुमच्या आयफोनची बॅटरी लाइफ दीर्घ कालावधीसाठी टिकवून ठेवण्यासाठी, जसे की, ऑफिसच्या सुट्टीच्या दिवशी तुमचा बॅटरी सुमारे ५० टक्के चार्ज झाली असल्याची खात्री करा. पूर्ण चार्ज झालेल्या किंवा पूर्णपणे डिस्चार्ज झालेल्या बॅटरीसह फोन वापरू नका. यामुळे बॅटरी लाइफवर परिणाम होतो.
५. लो पॉवर मोड चालू करा :
ॲपलने iOS 9 सह ‘लो पॉवर मोड’ सादर केला आहे. हे फीचर डिस्प्ले ब्राइटनेस कमी करून, ॲनिमेशन कमी करून आणि बॅग्राऊंड ॲप रिफ्रेश करून बॅटरी लाइफ ऑप्टिमाइझ करण्यात मदत करते. जेव्हा तुमची बॅटरी २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर पोहोचते. तेव्हा लो पॉवर मोड ऑन केला जातो. याशिवाय, तुम्ही फोनच्या सेटिंग्जमध्ये बॅटरीवर टॅप करून ही सेटिंग इनेबल करू शकता. फोन चार्ज झाल्यावर हा मोड ऑटो स्विच ऑफ होतो.