Stop Promotional Calls DND : स्मार्टफोनमध्ये येणारे प्रमोशनल एसएमएस आणि कॉल्समुळे लोक त्रस्त झाले आहेत. या कॉल्समुळे कधीकधी महत्वाचे कॉल्स घ्यायचे राहून जातात. वारंवार येणाऱ्या या कॉल्समुळे शांतता भंग होते. कामात असताना असले कॉल्स अडथळे निर्माण करतात. तुम्ही जर प्रमोशनल कॉल्समुळे त्रासले असाल आणि त्यांच्यापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्ही डीएनडी अॅक्टिव्हेट करू शकता. ते करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
डीएनडी अॅक्टिव्हेट करण्यासाठी या संपर्क क्रमांकावर कॉल करा
- डीएनडी अॅक्टिव्हेट करण्यासाठी १९०९ संपर्क क्रमांक डायल करा.
- या क्रमांकावर तुम्ही मोफत कॉल करू शकता.
- कॉल लागल्यानंतर आईव्हीआर लक्षपूर्वक ऐका. पूर्ण डीएनडी अॅक्टिव्हेट करण्यासाठी १ आणि पार्शियल डीएनडी अॅक्टिव्हेट करण्यासाठी २ क्रमांक दाबा.
- येथे केवळ जाहिरात किंवा प्रमोशनल डीएनडी अॅक्टिव्हेट करण्यासाठी १ डायल करू शकता.
- या नंतर पुष्टी करण्यासाठी ० दाबा.
- आता ४८ तासांच्या आता तुम्हाला पूर्ण डीएनडी अॅक्टिव्हेट झाल्याचा एसएमएस मिळेल.
(२५ हजारांच्या आत मिळतंय 40 Inch Smart Tv, इअर एन्ड सेलमधील या Best deals करतील मोठी बचत)
एसएमएसद्वारे करा अॅक्टिव्हेट
- एसएमएसद्वारे डीएनडी अॅक्टिव्हेट करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये मेसेज अॅप उघडा.
- यानंतर ‘START 0’ लिहून स्पेस न टाकता १९०९ वर एसएमएस करा.
- यानंतर पूर्ण डीएनडी अॅक्टिव्हेट करण्यासाठी १ टाईप करा आणि सेंड करा.
- ४८ तासांत एसएमएस मिळाल्यानंतर डीएनडी अॅक्टिव्हेट होईल.
(इन्स्टाग्रामवरील आवडते Video, Reels करू शकता डाऊनलोड, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
कस्टमर केअरमध्ये कॉल करून अॅक्टिव्हेट करू शकता
तुम्ही डीएनडी अक्टिव्हेट करण्यासाठी कस्टमर केअरमध्ये कॉल करू शकता. समस्या सांगितल्यानंतर डीएनडी अॅक्टिव्हेट करण्याची विनंती करा. याप्रकारे तुम्ही प्रमोशनल एसएमएस आणि कॉल्सपासून सुटका मिळवू शकता.