Affordable Jio Phones List In Marathi : इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) २०२४ च्या माध्यमातून रिलायन्स जिओने अनेक घोषणा केल्या आहेत. त्यातच कंपनीने नवीन ४ जी फोन सादर केले आहेत. जिओ भारत व्ही ३ आणि व्ही ४ हे दोन मॉडेल भारतात लाँच करण्यात आले आहेत. या फोन्सच्या माध्यमातून अजूनही २जी वापरणाऱ्या ग्राहकांना ४जी नेटवर्ककडे आकर्षित करणे हा कंपनीचा उद्देश आहे. जिओ भारत व्ही ३ एक स्टायलिश फोन आहे आणि जिओ भारत व्ही ४ प्रीमियम मिनिमलिस्ट अनुभव देतो. चला जाणून घेऊया त्यांची किंमत व फीचर्स (Affordable Jio Phones)…

जिओचे नवीन ४ जी फोन (Affordable Jio Phones List ) :

जिओ भारत व्ही ३ आणि व्ही ४ (JioBharat V3 and V4) :

रिलायन्स जिओने जिओ भारत व्ही ३ व व्ही ४ हे फीचर फोन सादर केले आहेत. दोन्हीची किंमत १,०९९ रुपये आहे. हे ४जी फोन १००० एमएएच बॅटरी, १२८ जीबी स्टोरेजला सपोर्ट करते. त्यामध्ये २३ भारतीय भाषांचा समावेश आहे. त्यात आवश्यक जिओ सेवांसह जिओ टीव्ही, जिओ सिनेमाज, जिओ पे आणि जिओ चॅट आदी जिओच्या अनेक ॲप्सचा वापर करता येईल.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?

हेही वाचा…WhatsApp Video Call Feature : मिट्ट काळोखातही दिसा ठळक, व्हॉट्सॲपने व्हिडीओ कॉलसाठी आणलंय खास फीचर

जिओ भारत बी २ फोन (JioBharat B2 Phone) :

हा फोन तुम्हाला १,३९९ रुपयांना खरेदी करता येईल. जिओ भारत ४ जी कीपॅड फोनमध्ये १.७७ इंच स्क्रीन, १२८ जीबीपर्यंत क्षमतेच्या बाह्य एसडी कार्डांना सपोर्ट करते. फोनमध्ये १००० एमएएच बॅटरी आहे. डिव्हाइसमध्ये डिजिटल रिअर कॅमेरा आहे आणि त्यामध्ये जिओ सिनेमा, जिओ सावन, जिओ पे आदी जिओच्या अनेक ॲप्सचा वापर करता येतो. जिओ भारत २३ भाषांना सपोर्ट करतो; ज्यामुळे विविध युजर्सच्या आवडींनुसार तो तयार करण्यात आला आहे.

जिओ भारत फोन (JioBharat Phone) :

के १ कार्बोन (K1 Karbonn) हा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन ग्रे-रेड, पांढरा-लाल, काळा राखाडी अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. ९९९ रुपये व १९९९ रुपये किंमत असलेला हा फोन 4G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. युजर्स क्रिस्टल-क्लीअर एचडी व्हॉइस क्लॅरिटीचा आनंद घेऊ शकतात. ते त्यांच्या पसंतीच्या भाषेत ४५५ हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल पाहू शकतात आणि जिओ सिनेमा, जिओ सावनद्वारे चित्रपट, स्पोर्ट्स हायलाइट्स, म्युझिक लायब्ररीमध्ये प्रवेश करू शकतात. याव्यतिरिक्त जिओ भारत के १ घेणारे युजर्स यूपीआय पेमेंट एनेबल करू शकतात . तसेच तुम्ही हा फोन (Affordable Jio Phones) जिओ मार्टवर सहज खरेदी करू शकता.