अनेक ग्राहक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो Nothing Phone 2a स्मार्टफोन अखेरीस भारतामध्ये लाँच झालेला आहे. नथिंग या कंपनीने लाँच केलेला हा तिसरा स्मार्टफोन आहे. आपण याआधी नथिंग स्मार्टफोनबद्दल अंदाजे माहिती पाहिली होती. मात्र, आता या नव्याकोऱ्या स्मार्टफोनची खासियत, फीचर्स आणि किंमत पाहणार आहोत. तसेच हा फोन किती रंगांमध्ये उपलब्ध आहे हेदेखील आपण पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Nothing Phone 2a – फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

रॅम आणि स्टोरेज :

नवाकोरा नथिंग फोन 2a हा पॉवर्डबे मीडियाटेक डिमेन्सिटी ७२०० प्रो [MediaTek Dimensity 7200 Pro] चिपसेट असून, याचा रॅम १२GB एवढा आहे. इतकेच नाही तर १२ gb व्यतिरिक्त अजून ८ GB रॅम बूस्टरदेखील बसवण्यात आला आहे. म्हणजेच याचा एकूण रॅम हा २० GB इतका होतो. यामध्ये ३ प्रकारचे रॅम आणि स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.

या पर्यायांपैकी २ मॉडेल्स हे ८ GB रॅमसह १२८ GB किंवा २५६ GB स्टोरेज असलेले व्हेरियंट्स आहेत. तर तीस मॉडेल हे १२ GB आणि २५६ GB स्टोरेज व्हेरियंट असलेले आहे.

हेही वाचा : आता Instagramच्या ‘हिडन’ फीचरमध्ये खेळता येईल भन्नाट गेम! स्टेप्स बघा, खेळून पाहा…

कॅमेरा :

उत्तम फोटोग्राफी करता यावी यासाठी Nothing Phone 2a मध्ये ड्युअल सेटअपचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये ५० मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा असून, त्याच्या जोडीला f/1.88 अपेर्चर लेन्स आणि 1/1.56 इंच सेन्सर देण्यात आला आहे. तसेच दुसरा कॅमेरा हासुद्धा ५० मेगापिक्सेलचा असून, तो अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आहे. नव्या नथिंग फोन a २ स्मार्टफोनमध्ये, उत्तम सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी नथिंग फोन २ प्रमाणेच ३२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.

स्क्रीन आणि बॅटरी :

Phone 2a स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फ्लेक्झबल अमोल्ड [AMOLED] डिस्प्ले बसवण्यात आलेला आहे. याचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका असून ब्राईटनेस १३०० nits एवढा आहे. यामध्ये ५,००० mAh बॅटरी बसवण्यात आली आहे; जी ५४ W एवढ्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. परंतु, या फोनचा चार्जर फोनसह येत नाही याची नोंद ग्राहकांनी घ्यावी.

हेही वाचा : आता WhatsApp वरून इतर अॅप्सवर पाठविता येतील मेसेज? ‘या’ फीचरबद्दल अधिक माहिती पाहा…

किंमत :

भारतामध्ये Nothing Phone 2a स्मार्टफोनचे एकूण तीन व्हेरियंट उपलब्ध आहेत. तिन्ही व्हेरियंटच्या किमती पाहा.

Nothing Phone 2a ८GB रॅम + १२८ GB स्टोरेज – या मॉडेलची किंमत २३, ९९९/- रुपये इतकी आहे.

Nothing Phone 2a ८GB रॅम +२५६ GB स्टोरेज – या मॉडेलची किंमत २५, ९९९/- रुपये इतकी आहे

आणि
Nothing Phone 2a १२ GB रॅम + २५६ GB स्टोरेज – या मॉडेलची किंमत २७,९९९/- रुपये इतकी आहे

हा नवाकोरा फोन काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रांगांमध्ये उपलब्ध आहे. एकंदरीत पाहता हा उत्तम फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि कॅमेरा असलेला स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असा आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Affordable nothing phone 2a launched what is the price features and specification check out the details dha