प्रत्येक मोबाईलप्रेमीला वाटतं असतं आयफोन नव्या सीरिजचा फोन आपल्याकडे आसावा. मात्र अनेकदा किंमत पाहता हात आखुडता घ्यावा लागतो. मात्र काही जण मोबाईल घेण्यास यशस्वी ठरतात. आयफोनची नवीन सीरिज घेतल्यानंतर उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. नेमकं कुठून आणि कशी सुरुवात करायची असा प्रश्न पडतो. आपण आधीपासून आयफोन वापरकर्ते असाल तर तुम्हाला तितका त्रास होणार नाही. मात्र पहिल्यांदाच आयफोन खरेदी केला असल्यास फोन अनबॉक्सिंग केल्यानंतकर काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणं आवश्यक आहे.
आयफोन खरेदी केल्यानंतर सर्वात प्रथम अॅप्पल खातं तयार करणं आवश्यक आहे. अॅप्पल आयडीमुळे आय क्लाउडमधून तुम्हाता डेटा सिंक करता येतो. कॅलेंडर, ईमेल तसेच अॅप्स, गेम्स, संगीत, चित्रपट इत्यादी डाउनलोड आणि खरेदी करता येतात.
- फोन सुरु केल्यानंतर अॅपल आयडी तयार करण्यास सांगितलं जाईल.
- त्यात फक्त तुमचा ईमेल आयडी टाइप करा आणि पुढील सूचनांचे पालन करा
- तुमच्या आधीपासून आयओएस डिव्हाइस आणि अॅप्पल आयडी असल्यास तुम्ही आय क्लाउडला सिंक करू शकता
- त्यामुळे सध्याच्या डिव्हाइसवर स्टोर केलेला सर्व डेटा आणि अॅप्स आपोआप ट्रान्सफर होतील
तुम्ही तुमचा आयफोन ऑटोमॅटिकली कसा सेट कराल?
- नवीन आयफोनवर सर्वात प्रथम भाषा पर्याय निवडा
- त्यानंतर आयफोनवर Continue टॅप येईल. त्यावर क्लिक करा. तेव्हा तुम्हाला अॅप्पल आयडी विचारला जाईल किंवा सेट करण्यास सांगितलं जाईल.
- तुमच्या नवीन आयफोनवर दिसणारी इमेज स्कॅन करण्यासाठी तुमचा सध्याचा आयफोन वापरा.
- तुमच्या नवीन आयफोनवर तुमच्या सध्याच्या आयफोनचा पासकोड एंटर करा.
- तुमच्या नवीन आयफोनवर टच आयडी किंवा फेस आयडी सेट करा.
- तुमच्या मागच्या फोनमधील बॅकअप घ्यायचा की नाही हा पर्याय निवडा.
- आय क्लाउड किंवा आयट्यून बॅकअपवरून तुमचे नवीन डिव्हाइस पुनर्संचयित करा. नवीन आयफोन म्हणून सेट करणे किंवा अँड्रॉइड डिव्हाइसवरून डेटा हस्तांतरित करणे निवडा.
- अटी आणि शर्तींना सहमती दर्शवा.
- आयफोनमध्ये स्थान आणि वापर विश्लेषण सेट करण्यासाठी सेटिंग फॉर सिरिचा वापर करा.
आयफोनमधील वॉलपेपर आणि रिंगटोन बदलण्यासाठी
वॉलपेपर आणि रिंगटोनबाबत प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात. सर्वात पहिल्यांदा वॉलपेपर बदलतात अशी प्रक्रिया करावी लागेल. होम स्क्रिनवरील आयफोन सेटिंग्समध्ये जा. Settings -> Wallpaper -> Choose a New Wallpaper असं ऑप्शन सिलेक्ट बदल करा. तसाच बदल रिंगटोनमध्येही करता येईल. Settings -> Sounds -> Ringtone असे ऑप्शन सिलेक्ट करत रिंगटोन बदलता येईल. त्याचबरोबर इतर सेंटिंग्सही करू शकता.आयफोन १३ ची स्क्रीन मागील काही आयफोनपेक्षा अधिक टिकाऊ आहे, तरीही तुम्हाला फोनची स्क्रीन जपून वापरण्याची आवश्यकता आहे. पहिली बाब म्हणजे तुम्ही जितका तुमचा आयफोन जास्त वापरता तेवढे तुमच्या स्क्रीनला स्क्रॅच येतील. तसेच फोन खिशातून आत आणि बाहेर करता तेव्हाही स्क्रॅच येण्याची शक्यता आहे. आयफोन १३ ची स्क्रिन महाग आहे, हे विसरू नका. त्यामुळे स्क्रिनगार्ड लावणं कधीही चांगलंच ठरेल.