iphone 16 series launch- Apple discontinues some products: ॲपलचा ‘इट्स ग्लोटाइम-२०२४’ इव्हेंट सोमवारी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी पार पडला. या इव्हेंटमध्ये ॲपल वॉच १०, आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो, आयफोन १६ प्रो मॅक्स, ॲपल वॉच एसई, ॲपल वॉच अल्ट्रा २, एअरपॉड्स ४ हे प्रोडक्ट्स लाँच करण्यात आले. आता या नव्या कोऱ्या सीरिजच्या लाँचसह अ‍ॅपलने त्यांचे काही लोकप्रिय प्रोडक्ट्स बंद केले आहेत.

अ‍ॅपलने त्यांची iPhone 16 सीरिज आणि अ‍ॅपल वॉच सीरिज १० लाँच केल्यानंतर अनेक जुने आयफोन आणि ॲपल वॉच मॉडेल बंद केले आहेत. बंद केलेल्या मॉडेलमध्ये iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max, iPhone 13 आणि Apple Watch Series 9 यांचा समावेश आहे.

Elli Avram
एक्स बॉयफ्रेंड अचानक परत आला, पोलिस ठाण्यामध्ये गेल्यावर म्हणाला…; ‘इलू इलू १९९८’ फेम एली अवराम म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Alphonso Mangoes arrived in APMC market Navi Mumbai
एपीएमसीत हापूस दाखल
Ola, Uber govt notices
Ola, Uber Govt Notices : iPhone वापरता की अँड्रॉइड याचा कॅबच्या भाड्यावर फरक पडतो? केंद्राच्या नोटीशीनंतर ओला, उबरने दिलं उत्तर
Jio Removed Three Value Recharge Plans With Limited Data See more Details
अरेरे यार हे काय झालं?? जिओने ‘हे’ ३ प्लॅन्स केले बंद; दरवाढीनंतर जिओचा युजर्सना आणखी एक धक्का
Centres Notice to Ola, Uber : iPhone आणि अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यासांठी आकारलं जातंय वेगवेगळं भाडं? ओला, उबर कंपन्यांना केंद्र सरकारची नोटीस
Image Of Vijay Shekhar Sharma
“iPhone 16 मध्ये इतका वाईट कॅमेरा कसा काय?”, पेटीएमच्या संस्थापकांची पोस्ट व्हायरल
Israel Palestine ceasefire marathi news
इस्रायली ओलीस, पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता

हेही वाचा… आयफोन १६ सीरिज एआयसह झाली लाँच, ४८ मेगापिक्सेल कॅमेरा अन्…; जाणून घ्या फीचर्स, किंंमत आणि बरंच काही…

अ‍ॅपलचे हे प्रोडक्ट्स यापुढे Apple च्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध नाहीत, तरीही ते थर्ड पार्टी रिटेलर्स किंवा रिफरबिश्ड युनिट्स म्हणून उपलब्ध असू शकतात. iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि Apple Watch Series 9 हे सर्व प्रोडक्ट्स सप्टेंबर २०२३ मध्ये लाँच करण्यात आले होते, तर लोकप्रिय iPhone 13 हा सप्टेंबर २०२१ मध्ये लाँच झाला होता.

भारतात सध्या ‘हे’ आयफोन असणार उपलब्ध

अ‍ॅपलने वरील मॉडेल्स बंद केल्यानंतर, सध्या Apple च्या अधिकृत वेबसाइटद्वारे भारतात उपलब्ध असलेल्या iPhone मॉडेल्समध्ये खालील मॉडेल्स समाविष्ट आहेत:

iPhone SE (2022): ४७,६०० रुपयांपासून सुरू

iPhone 14: ५९,९९० रुपयांपासून सुरू

iPhone 14 Plus: ६९,९९० रुपयांपासून सुरू

iPhone 15: ६९,९९० रुपयांपासून सुरू

iPhone 15 Plus: ७९,९९० रुपयांपासून सुरू

अ‍ॅपल वॉचची उपलब्धता

नवीन Apple Watch Series 10 आणि अपडेटेड Apple Watch Ultra 2 व्यतिरिक्त, Apple Watch SE भारतात खरेदीसाठी उपलब्ध आहे, ज्याची सुरुवात रु. २४,९०० इतकी आहे. Apple Watch Series 10 आणि Apple Watch Ultra 2 च्या नवीन ब्लॅक टायटॅनियम व्हेरियंटसाठी प्री-ऑर्डर चालू आहेत, याची विक्री २० सप्टेंबरपासून सुरू होईल. Apple Watch Ultra 2 ची सुरुवात रु. ८९,९०० पासून होते, तर Apple Watch Series 10 ची सुरुवात रु. ४६,९०० पासून होते.

नवीन प्रोडक्ट्स लाँच केल्यावर Apple ची जुनी मॉडेल्स बंद करणे ही त्यांची एक सामान्य प्रथा आहे. यामागचा मुख्य हेतू म्हणजे, प्रोडक्ट लाइनअप सुव्यवस्थित करणे आणि ग्राहकांना नवीनतम प्रोडक्ट्समध्ये अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

Story img Loader