एलॉन मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर सुरू झालेल्या कार्यवाहीमध्ये अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडातर तर आले आहे. भारतामध्ये सुमारे २३० ते अडीचशेच्या दरम्यान ट्विटरचे कर्मचारी होते, ‘मिंट’ने दिलेल्या माहितीनुसार, आता भारतामधील ट्विटरच्या कार्यालयात १० कर्मचारीही शिल्लक नाहीत.

आणखी वाचा : Samsung vs apple : पण त्यांच्याकडे असा फोन नाही.. सॅमसंगने जाहिरातीतून केले अ‍ॅपलला ट्रोल, पाहा हा व्हिडिओ

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
Lok Adalat held for first time in 33 years in history of Maharashtra Administrative Tribunal ( mat )
‘मॅट’च्या इतिहासात प्रथमच लोक अदालत,१२६ जणांना नोकरी
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट

भारतात, बंगळुरू, गुरुग्राम आणि मुंबई अशी तीन ठिकाणी ट्विटरची कार्यालये आहेत. एलॉन मस्क यांनी कंपनीचा ताबा घेतल्यानंतर सीइओ पराग अग्रवाल, पॉलिसी चीफ विजया गड्डे आदी अतिवरिष्ठांना घरचा रस्ता दाखवला. गुरुवारपासून तर ट्विटरच्या सर्वच कर्मचाऱ्यांची झोप उडाली होती. कारण कंपनीतर्फे सर्व कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीचा मेमो पाठवण्यात आला होता. त्यामध्ये सुचविण्यात आले होते की, शुक्रवारी त्यांनी कार्यालयात न येता घरीच थांबावे, त्यांना इ-मेलद्वारे कंपनीचा निर्णय कळविण्यात येईल. त्यानंतरच्या आठवड्यात त्यांना मिळणारी नुकसानभरपाई आणि त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या चीजा परत घेण्यासंदर्भातील सूचना असलेला मेल पाठविण्यात येईल. त्यामुळे गुरुवारची रात्र आणि शुक्रवार (भारतीय प्रमाणवेळेनुसार) संध्याकाळपर्यंत ट्विटरचे कर्मचारी अस्वस्थ होते.

आणखी वाचा : “काही पर्यायच उरला नव्हता”, ट्विटरमधील ५० टक्के कर्मचारी कपातीवर एलॉन मस्क यांचं स्पष्टीकरण!

शुक्रवारी संध्याकाळी साडेआठनंतर कर्मचाऱ्यांना कंपनीकडून मेल येण्यास सुरुवात झाली. आणि कर्मचाऱ्यांनी आपल्याला आलेल्या मेलनुसार माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यासही सुरुवात केली. बाहेर पडावे लागलेल्या कर्मचाऱ्यांनी तर एकमेकांना धीर देण्यासाठी #OneTeam असा हॅशटॅगही तयार केला आणि आपापली पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली. शुक्रवार रात्रीपासून आज शनिवारी दिवसभर ट्विटरच्या कर्मचारी कपातीच्या विविध पोस्ट सर्वाधिक ट्रेण्डिंगमध्ये होत्या. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना कंपनीचा असलेला स्लॅक, इमेल आणि लॅपटॉपचा अॅक्सेसही काढून टाकण्यात आला आहे.

आणखी वाचा : ४७९ रुपयांच्या रिचार्जमध्ये Vodafone, Airtel, Jio पैकी कोणत्या प्लॅनवर सर्वाधिक ऑफर्स आहेत जाणून घ्या

स्टॅटिस्टा डॉटकॉमच्या माहितीनुसार, भारतात ट्विटरचे २३. ६ दशलक्ष वापरकर्ते आहेत. डेलेवर येथे दाखल करण्यात आलेल्या प्रतिदाव्यामध्ये स्वतः मस्क यांनीच भारत ही ट्विटरची जगातील सर्वात मोठी तिसरी बाजारपेठ असल्याची माहिती दिली होती. खरे तर ट्विटरची भारतातील इंजिनीअरिंग टीम वाढविण्यात येईल, अशी घोषणा ट्विटरने एप्रिल, २०२१ मध्ये केली होती. त्यासाठी उबरच्या कार्यकारी अपूर्वा दलाल यांची इंजिनीअरिंग विभागाच्या संचालक म्हणून नियुक्तीही केली होती. आता केवळ कराराच्या नियुक्तीवर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनाच केवळ कंपनीत ठेवणे ट्विटरने पसंत केले आहे.

Story img Loader