Dangerous Roads Warning: रस्ते अपघातांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यावर्षात अनेकांनी याच अपघातामुळे आपले प्राणही गमावले आहेत. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचेही नाव या यादीत समाविष्ट आहे. तर नुकताच क्रिकेटर ऋषभ पंत सुद्धा रस्ते अपघटवून थोडक्यात बचावला आहे. काही वेळा या अपघातांसाठी चालकांचा बेजबाबदारपणाच कारण असतो तर अनेकदा रस्त्याची खराब अवस्था, रहदारी, खड्डे यामुळे सुद्धा अपघाताची परिस्थिती ओढवू शकते. यावर गूगलने एका उत्तम अॅपचा पर्याय सर्वांसमोर आणला आहे.
हे ही वाचा<< चुकूनही गुगलवर ‘या’ ५ गोष्टी सर्च करू नका, अन्यथा पोलिस येतील थेट तुमच्या दारी
गुगलच्या मालकीचे अॅप Waze वरून वापरकर्त्यांना वाहन चालवताना धोकादायक रस्त्यांची अगोदरच माहिती दिली जाते. Waze च्या नव्या बीटा आवृत्तीसह, वापरकर्ते नकाशावर लाल रंगाचे उच्च-जोखीम असलेले रस्ते शोधू शकतात, अहवालानुसार, हे वैशिष्ट्य चालकाला प्रवासात सावध करते व धोकादायक रस्त्यांशी संबंधित एक पॉप-अप सूचना देखील दर्शवते.
हे ही वाचा<< ऋषभ पंतला भेटायला गेले अनिल कपूर व अनुपम खेर; नेटकऱ्यांना फोटोमध्ये दिसलं भलतंच.. पाहा मीम्स
दरम्यान अशाप्रकारची सुविधा गूगल मॅप्स वर सुद्धा उपलब्ध आहे. यात ट्रॅफिकविषयी माहिती दिली जाते. आपण टाकलेल्या लोकेशनमध्ये रस्त्यात ज्या ठिकाणी सर्वाधिक ट्रॅफिक असेल तो रस्ता लाल, मध्यम ट्रॅफिक मध्ये केशरी रंग दाखवला जातो. हे अपडेट्स आपल्या रिअल टाइम मिळू शकतात. Waze चे अपडेट्स आपल्याला रस्त्याच्या गुणवत्तेविषयी माहिती देते, जेणेकरून आपण आपल्या ड्रायव्हिंगमध्ये बदल करू शकता. याशिवाय, यंदा जुनमध्येच गूगल मॅप्स वर आपण ज्या भागात प्रवास करत आहात तेथील हवेच्या गुणवत्तेविषयी माहिती देण्याचे फीचरही ऍड करण्यात आले आहे.