CES २०२३ च्या आधी सॅमसंगने Neo QLED TVs, OLED TVs आणि MicroLED TV ची नवीन रेंज जाहीर केली आहे. दक्षिण कोरियाची कंपनी असणाऱ्या सॅमसंगचे हे नवीन लाईनअप वापरकर्त्यांना नवीन अधिक पर्याय उपलब्ध करेल. CES २०२३ च्या आधी सॅमसंगने निओ क्यूएलईडी टीव्ही, ओएलईडी टीव्ही आणि मायक्रोएलईडी टीव्हीची नवीन रेंज जाहीर केली आहे.
दक्षिण कोरियाची कंपनी असणाऱ्या सॅमसंगचे हे नवीन लाईनअप वापरकर्त्यांना नवीन अधिक पर्याय उपलब्ध करेल. नवीन निओ QLED मॉडेल हे ४ के आणि ८ के रिझोल्युशनमध्ये येतात. यांचा स्क्रीन ५० ते १४० इंचामध्ये येतो. तर OLED टीव्ही लाइनअपमध्ये १४४ Hz रिफ्रेश रेट आणि सॅमसंग गेमिंग हब असणार आहे. OLED टीव्हीसह, टेक जायंट गेमिंगसाठी एएमडीचे फ्रीसिंक प्रीमियम प्रो प्रमाणपत्र देखील ऑफर करणार आहे.
हेही वाचा : CES 2023: AMD ने लाँच केले ‘हे’ मोबाईल प्रोसेसर; जाणून घ्या खासियत
सॅमसंग निओ क्यूएलईडी टीव्ही: फिचर्स
सॅमसंग Neo QLED TV ८ के आणि ४ के रिझोल्युशनमध्ये येतात. यामध्ये न्यूरल क्वांटम प्रोसेसरचा सपोर्ट असणार आहे. यामध्ये एक नवीन ऑटो HDR रीमास्टरिंग अल्गोरिदम देखील आहे जो AI डीप लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून स्टँडर्ड डायनॅमिक रेंज कंटेंटवर रीअल-टाइम एचडीआर इफेक्ट्स सीननुसार सीनवर लागू करतो.
हेही वाचा : CES 2023: कॉन्टिनेंटलचे नवीन 47-इंच ऑटोमोटिव्ह डिस्प्ले सादर; पाहा काय असेल खास
सॅमसंग मायक्रोएलईडी आणि ओएलईडी टीव्ही: फिचर्स
सॅमसंग कंपनीने यावर्षी ५०,६३, ७६,८९,१०१, ११४ आणि १४० इंचाचे डिस्प्ले आकाराचे मायक्रोएलईडी टीव्ही लाँच केले आहेत. यामध्ये बेझल -लेसचे डिझाईन असणार आहे. यामध्ये न्यूरल क्वांटम प्रोसेसरसह सॅमसंग गेमिंग हबस हे फीचर्स मिळतात. दरम्यान सॅमसंगने आपला Samsung Galaxy F04 भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ६.५-इंचाच्या HD+ डिस्प्लेसह येतो आणि तो ऑक्टा-कोर MediaTek Helio P35 SoC द्वारे समर्थित आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये १५W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,000mAh बॅटरी आहे. Samsung Galaxy F04, एक बजेट स्मार्टफोन ₹ ९,४९९ च्या किंमतीला सूचीबद्ध आहे. ग्राहक Opal Green Jade आणि Purple colour मध्ये हे हँडसेट खरेदी करू शकतात. हे १२ जानेवारी २०२३ पासून याची विक्री सुरु होईल.