OpenAI ने ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. तेव्हापासून त्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. चॅटजीपीटी सध्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. AI Chatgpt ने भारतीय राजकारणातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळखले जाणाऱ्या काँग्रेस पक्षाचचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल एक मत व्यक्त केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे AI ने मत व्यक्त केले आहे.
OpenAI चे ChatGPT आणि Microsoft चे Bing AI हे दोन्ही penAI च्या GPT लार्ज लँग्वेजवर आधारित आहे. या दोन्ही AI वर याला विकसित करणाऱ्या लोकांइतकेच पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा पक्षपातीपणा लक्षात घेऊन ChatGPT आणि Bing ला भारतीय राजकारणाच्या परिस्थितीवर बॉट्सचे काय म्हणणे आहे हे पाहण्यासाठी अनेक प्रश्न विचारण्यात आले. याबाबतचे वृत्त Firstpost वृत्तसंस्थेने दिले आहे.
हेही वाचा : Tech Layoffs: ‘Dunzo’ मध्ये दुसऱ्यांदा होणार ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या
अशाच एका सत्रात, ChatGPT ला विचारण्यात आले की काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सत्तेत येण्याच्या शक्यतांबद्दल त्याचे काय मत आहे. ”राहुल गांधी भारताचे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे का ?” यावर, चॅटजीपीटीने त्यांच्या मागील निवडणुकीतील तसेच विरोधी पक्षांच्या कामगिरीचा अभ्यास करून अतिशय सूक्ष्म आणि तपशीलवार उत्तर दिले. भविष्य आणि राजकीय परिणाम याबद्दल खात्रीशीर भविष्यवाणी करणे कठीण आहे. म्हणून मी राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होण्याच्या शक्यतांवर एक निश्चित उत्तर देऊ शकत नाही.
राहुल गांधी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी संबंधित एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत. ज्यांचा भारतातील राजकीय प्रभावाचा दीर्घ इतिहास आहे. त्यांनी पक्षात उपाध्यक्षपदासह अनेक पदे भूषवली आहेत आणि ते खासदार आहेत. तथापि, त्यांची राजकीय कारकीर्द यश आणि अपयश या दोन्हींद्वारे चिन्हांकित केली गेली आहे.
हेही वाचा : ChatGPT बाबत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचं मोठं विधान; म्हणाले, “हे जग …”
”राहुल गांधी भारताचे पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे का ?” असा प्रश्न AI चॅटबॉटल विचारण्यात आला.
या प्रश्नावर चॅटजीपीटीने उत्तर दिले आहे. मी जेव्हा इंग्लंडची राणी होईन , तेव्हाच राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होतील असे तिरकस उत्तर AI ChatGpt ने दिले आहे. म्हणजे असे काही नाही कारण सर्वत्र कितीतरी अनोख्या गोष्टी घडतात च ना ? कदाचित परग्रहवासीय (एलियन) खाली येतील आणि त्यांना भारताचा शासक म्हणून नियुक्त करतील ? असे उत्तर AI ने दिले आहे.