प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या डेटाच्या मदतीने सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेला (AI- आर्टिफिशल इंटेलिजन्स) तुमच्याही आधी नेमकं कळतं की, विमानाच्या तिकिटासाठी तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे मोजायला तयार आहात. सध्या विमान उद्योग एका दुष्टचक्रात फसलेला असून एआयच्या मदतीेने या उद्योगातील नफा वाढेल आणि तो त्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल, अशी अपेक्षा आहे.

आणखी वाचा : Apple vs Google: टिम कूक यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न ‘गुगल’च्याच अंगलट; ‘त्या’ स्क्रीनशॉटनं केली पोलखोल

इंटरनेटवर सर्च केली जाणारी माहिती, कोविडची सद्यस्थिती आणि हवामानाच्या अंदाजांपासून ते फुटबॉल स्पर्धांतील निकालांपर्यंतच्या सर्व माहितीच्या आधारे दैनंदिन आयुष्यात वेळ वाचविण्यासाठी किंवा इतरही अनेक बाबींसाठी विमानप्रवासाची गरज कशी आहे, याचा अभ्यास सध्या मशिन लर्नींगच्या माध्यमातून सुरू आहे. गेली सुमारे दोनहून अधिक दशके विमानाच्या तिकिटांचे दर विशिष्ट पारंपरिक पद्धतीनेच ठरवले जात होते. आता मात्र खुद्द संगणकच स्वतः सारे काही शिकून, माहितीचे विश्लेषण करून त्यातील शक्याशक्यता प़डताळून पाहू लागला आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळेच हे शक्य झाले आहे, असे ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

आणखी वाचा : Airtel vs Jio vs Vi: दिवाळी बंपर ऑफर! जिओ, एअरटेल, व्हीचे सर्वात स्वस्त डेटा प्लॅन्स व फायदे जाणून घ्या

उपलब्ध माहितीचे एकत्रिकरण आणि विश्लेषण यामधून एखादे विमान तिकीट खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजण्याची ग्राहकांची तयारी आहे, याचा नेमका अंदाज संगणकाला येतो. त्यानुसार, तिकिटाचे दर खाली- वर केले जातात. बहुतांश वेळा ते वरच्याच दिशेेने जातात. ‘फेचर’ या इस्रायली स्टार्टअप कंपनीतर्फे या एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यांच्यामते यामुळे विमान कंपन्यांच्या महसूलात सुमारे १० टक्क्यांच्या आसपास वाढ अपेक्षित आहे.

आणखी वाचा : खुशखबर: आता YouTube वर 4K व्हिडीओ मोफत पाहता येणार; कंपनीने केली अधिकृत घोषणा

‘फेचर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉय कोहेन यांच्यामते प्रत्येक विमान तिकिटाच्या किंमतीचा नेमका अंदाज घेणे शक्य आहे. कोणत्या किमंतीला, किती ग्राहक तिकीट विकत घ्यायला तयार होतील, याचा अंदाज एआयला असतो.. हा अंदाज एवढा अचूक असतो की, विमानाचे उड्डाण होईपर्यंत यंत्रणेने निश्चित केलेले दर कमी करावे किंवा बदलावे लागतच नाहीत. ब्रिटिश एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलेक्स क्रूझ ‘फेचर’च्या संचालकांपैकी एक आहेत. ते म्हणतात, आमच्या या नव्या यंत्रणेपासून कोणतीच गोष्ट लपून राहात नाही. ब्राझिलियन विमान कंपनी असलेल्या ‘एझूल एसए’ने गेल्याच महिन्यात ‘फेचर’च्या एआय यंत्रणेचा प्रायोगिक वापर करत असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांना केलेल्या कोणत्याही इ-मेलला त्यांनी उत्तर दिलेले नाही, असे ‘ब्लूमबर्ग’ने म्हटले आहे.

आणखी वाचा : सॅमसंगने गुपचूप लाँच केला ४ जीबी पर्यंतची रॅम असणारा ‘हा’ स्मार्टफोन; मिळतील जबरदस्त फिचर्स

२०२० साली आलेल्या कोविडच्या महासाथीचा विमान उद्योगाला प्रचंड मोठा फटका बसला. अत्यावश्यक वगळता इतर विमानसेवा जगभरात पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ तेव्हा आली. यंदा कोविडोत्तर प्रथमच या उद्योगाचा महसूल ७८२ दशकोटी अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. असे असले तरी हा आकडा २०१९ रोजी मिळालेल्या ८३८ दशकोटी अमेरिकन डॉलर्सच्या आकड्यापेक्षा कमीच असणार आहे. सुमारे दशकभरापूर्वी विमानोड्डाण उद्योग दुष्टचक्रात सापडला, तेव्हापासून या उद्योगाचा विकासदर एक आकडीच राहिला आहे.

आणखी वाचा : वोडाफोन, जिओ व एअरटेलचे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे बेस्ट रिचार्ज प्लॅन्स कोणते? जाणून घ्या

आजवर या उद्योगाने पारंपरिक पद्धतींचाच वापर तिकिटांचे दर निश्चित करण्यासाठी वर्षानुवर्षे केला होता. त्यात केवळ निर्धारित केलेली किंमत मिळते. मात्र एआय थेट ग्राहकाच्याही नकळत त्याच्यापर्यंत पोहोचून, त्याच्या वर्तनाचा मानसशास्त्रीय अभ्यास करत त्याच्या बाबत नेमकेपणाने अंदाज घेत तिकिटाचे दर निश्चित करते. त्यामुळे यात नफ्याचे प्रमाण अधिक असते. जागतिक पर्यटन तंत्रज्ञान पुरविणाऱ्या ‘अॅक्सेल्या’ या कंपनीच्या सोल्युशन मार्केटिंग विभागाचे संचालक अमांदा कॅम्बपेल यांच्यामते पारंपरिक पद्धतींना विमानाच्या तिकिटाचे दर ठरविण्याबाबत अनेक मर्यादा आहेत, अशा मर्यादा एआय़ला नाहीत. शिवाय यात नेमकेपणाही अधिक आहे.

आणखी वाचा : दिवाळीच्या तोंडावर Apple ने दिला ग्राहकांना झटका! आयपॅड मिनीच्या किमतीत केली वाढ! आता मोजावे लागणार…

‘फेचर’चे रॉय कोहेन यांच्या मते, ही एआय यंत्रणा अद्याप बाल्यावस्थेत असली तरी या माहितीचे विश्लेषण ज्या पद्धतीने केले जाते ती प्रणाली अचंबित कऱणारी आहे. दर सेकंदाला प्रवास- पर्यटनाशी संबंधित पेटाबाइटस् एवढा डेटा- माहिती तयार होत असते. (एक पेटाबाइट म्हणजे ५०० दशलक्ष छापील पाने) या माहितीवर सेकंदागणिक प्रक्रिया करण्याचे काम एआय करते. जेवढी माहिती अधिक तेवढीच अचूकताही अधिक, कोहेन म्हणतात.

आणखी वाचा : Jio Laptop: दिवाळीच्या मुहूर्तावर Jio ने बाजारात आणला १५ हजारांचा लॅपटॉप; पाहा फिचर्स, स्पेसिफिकेशन

यात तिकिटांच्या दरनिश्चितीच्या क्षेत्रात कार्यरत ‘डेटालेक्स’ या कंपनीचे मुख्य उत्पादन अधिकारी कॉनोर ओ’सुलिवन म्हणतात, अॅमेझॉनसारख्या बड्या कंपन्यांनी यापूर्वीच मशिन लर्निंग आणि एआयचा वापर किती प्रभावी असतो, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे विमान उद्योगामध्येही तो होईलच अशी शक्यता आहे. मात्र आधीच दुष्टचक्रातून जात असलेल्या विमानकंपन्यांची एआयच्या वापरातून कोणताही धोका पत्करण्याची तयारी नाही. म्हणूनच ओ’सुलीवन म्हणतात, की, यात नफा मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता असली तरी धोकाही तेवढाच आहे. त्यामुळे विमान कंपन्यांचा यादिशेने असलेला प्रवास आस्ते कदम सुरू आहे.

आणखी वाचा : आता मुलांवर लक्ष ठेवणे सहज होणार शक्य! गुगलचे पालकांसाठी ‘फॅमिली लिंक’ अ‍ॅप!

अॅक्सेल्याचे टीम रिझ म्हणतात की, एआय व्यक्तिगत माहिती नोंदवत नसले तरी एखाद्याने प्रवासाच्या संदर्भात बुकिंग मध्येच सोडून दिले तर त्या ग्राहकाने असे का केले असावे, याचीही शोध एआय घेते. हे पूर्वीच्या यंत्रणेला शक्य नव्हते. या वेगळेपणामुळेच तो ग्राहक पुन्हा आला तर त्याने बुकिंग करण्याची शक्यता वाढते. त्याच वेळेस विमान पूर्णपणे भरलेही जाईल आणि कंपनीला चांगला नफाही होईल यावर एआयचा कटाक्ष असतो. हेच एआयचे वेगळेपण आणि यशाची गुरुकिल्ली आहे, ते म्हणतात.

Story img Loader