AI Transforming Agriculture In India : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयद्वारे भारतातील विशेषतः महाराष्ट्रातल्या बारामती प्रदेशातील शेतीमध्ये कसे परिवर्तन घडवून आणले याचे एक उत्तम उदाहरण शेअर केले आहे. एक्स (ट्विटर)वरील एका पोस्टमध्ये सत्या नाडेला यांनी एआयचे उपाय लहान शेतकऱ्यांना कसे त्यांच्या संसाधनांना अनुकूल बनविण्यात आणि पीक उत्पादन सुधारण्यात मदत करीत आहेत हे दाखवले आहे. तसेच या पोस्टने टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांचेसुद्धा लक्ष वेधून घेतले आहे आणि त्यांनी या व्हिडीओखाली “एआय सर्व काही सुधारेल” (AI will improve everything) अशी कमेंटसुद्धा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामतीत एआयद्वारे शेती

सत्या नाडेला यांच्या पोस्टने दुष्काळ, कीड व आर्थिक अस्थिरता यांसारख्या आव्हानांशी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर AI तंत्रज्ञानाचा कसा प्रभाव पडेल हे अधोरेखित केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत AI-enabled टूल्स शेतकऱ्यांना निर्णय घेण्यामध्ये कशी मदत करतात, ज्यामुळे अधिक चांगली शेती होऊ शकेल हेसुद्धा स्पष्ट केले आणि ते स्पष्ट करताना बारामती को-ऑपचा (Baramati Co-op) भाग असलेल्या एका लहान शेतकऱ्याचे उदाहरण अधोरेखित केले आहे.

बारामतीतील लहान शेतकरी एआयच्या मदतीने शेतीत प्रयोग करीत आहेत आणि याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यातून दिसून येतो आहे. एआयमुळे शेतात रसायने आणि पाणी यांचा वापरसुद्धा कमी होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ भाषेत एआयला प्रश्न विचारता येतील. एआय powered ॲग्रीकल्चर सोल्युशन इंटिग्रेट गेओस्पाटिअल डेटा, स्थानिक डेटा, रिअल-टाइम माती विश्लेषण व सॅटेलाईट इमेजिंग एकत्रित करतात आणि शेतकऱ्यांना सिंचन, कीटकनाशकांचा वापर व एकूण पीक व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवतात.

मायक्रोसॉफ्ट एआय-चालित प्रकल्पांद्वारे शेतीमध्ये सक्रियपणे गुंतले आहे. २०२२ मध्ये कंपनीने बारामतीमध्ये ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT)बरोबरच्या भागीदारीतून एक उपक्रम सुरू केला. या प्रकल्पात एआय, मशीन लर्निंग व सॅटेलाइट तंत्रज्ञान यांचा वापर करून शेतकऱ्यांना आरोग्यदायी आणि अधिक फायदेशीर कापणी करण्यात मदत केली जाते. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे मायक्रोसॉफ्टचा ॲज्युर डेटा मॅनेजर फॉर ॲग्रीकल्चर, जो मातीतील ओलावा, तापमान व पोषक घटकांबाबतचा रिअल-टाइम डेटा संकलित करतो. ही माहिती AI विश्लेषणासह एकत्रितपणे प्रक्रिया करून मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना दिली जाते. शेतकऱ्यांना मराठी, हिंदी व इंग्रजीसह अनेक भाषांमधून FarmVibes.AI आणि OpenAI सेवा यांसारख्या साधनांचा फायदा घेता येईल याबाबतची Microsoft खात्री करून घेते आणि मग तशी शेतकऱ्यांकडे शिफारस करते.

तर आता या नवीन कल्पनांचा परिणाम आधीच दिसून येत आहे. महाराष्ट्रातील एआय-सहायित शेतीमुळे सुक्रोज (sucrose) उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे, पीक एकसमानता सुधारली आहे आणि संसाधनांचा वापर कमी झाला आहे. बारामतीतील एआय-चालित शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये व्यापक उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२४ च्या कृषी महोत्सवात जिथे ADT बारामतीने AI-सहायित शेतीचे प्रदर्शन केले, जवळजवळ २० हजार शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी ‘साइन अप’ केले. सध्या हजार शेतकऱ्यांचा समावेश असलेला एक पथदर्शी कार्यक्रम सुरू आहे, ज्यामध्ये २०० आधीच AI-मार्गदर्शित ऊस लागवड उपक्रम राबवीत आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ai powered farming in maharashtras baramati region helps small scale farmers microsoft ceo satya nadella shares viral video asp