Windows AI laptops at lower price: सध्या लॅपटॉपचा वापर प्रचंड वाढला आहे. संगणकापेक्षा जास्तीत जास्त वापर आता लॅपटॉपचा केला जातो आहे. कारण वर्क फ्रॉम असो किंवा ऑफिसमधून काम करणं असो, हा लॅपटॉप प्रवासात घेऊन जाणं, ऑफिसमध्ये किंवा घरी बसून यावर काम करणं अगदीच सोप्प जातं. त्यामुळे या लॅपटॉपमध्ये आणखीन काही खास करता येईल किंवा देता येईल यासाठी सगळ्या टेक कंपन्यांमध्ये शर्यत चालू असते. तंत्रज्ञानावर भर देऊन आता प्रत्येक कंपनी त्यांच्या नवनवीन मॉडेलमध्ये एआयचा समावेश करू पाहते आहे, तर मायक्रोसॉफ्ट विंडोज (Windows) ने २०२४ च्या सुरुवातीला AI लॅपटॉप जास्त किमतीत बाजारात आणले.

पण, आता एआय फीचर्ससह विंडोज लॅपटॉप लवकरच एक लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. क्वालकॉमच्या प्रमुख यांनी अलीकडेच या गोष्टीची घोषणा केली आहे… त्यांनी म्हटले आहे की, ‘आम्हाला आशा आहे की लवकरच आमच्याकडे विंडोजवर चालणारे AI लॅपटॉप आणि त्याचा स्नॅपड्रॅगन एक्स एआय लॅपटॉप प्रोसेसर बाजारात एक लाख किंवा अगदी ८० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा असेल.’

semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

हेही वाचा…Aadhaar Card : आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? चिंता सोडा! फक्त ‘या’ सहा स्टेप्स फॉलो करा

परवडणारे AI लॅपटॉप :

लवकरच स्नॅपड्रॅगन एक्स सीरिज वेगवेगळ्या प्रोसेसरसह लॅपटॉप विस्तारित करेल. म्हणजेच क्वालकॉम एक प्रोसेसर सादर करू शकते, जो स्नॅपड्रॅगन एक्स एलिट चिपद्वारे कोपायलट (Microsoft Copilot AI) चालविण्यास सक्षम असेल, ज्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे २०२४ मध्ये लॅपटॉपच्या किमती अंदाजे ५७ हजार रुपयांपेक्षासुद्धा खाली येऊ शकतात. त्यामुळे भारतातील ग्राहकांना नवीन प्रोसेसरसह सुमारे ८० हजार रुपयांमध्ये Windows एआय लॅपटॉप ऑफर करतील, अशी अपेक्षा करू शकतात.

कंपनीच्या प्रमुखाने म्हटले की, एआय लॅपटॉप्सचे बजेट विभागामध्ये वर्गीकरण केले जाईल असे म्हणणे गमतीचे ठरेल. पण, या Windows AI लॅपटॉपच्या सध्याच्या किमती पाहता, पाच अंकांमध्ये एआय लॅपटॉपची किंमत पाहून ग्राहक नक्कीच उत्साहित होतील. सर्व्हिस, फीचर्सने परिपूर्ण असा हा एआय लॅपटॉप आपल्याला स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.