काल रात्री Apple चा WWDC इव्हेंट पार पडला. सीईओ टीम कूक यांनी या अनेक प्रॉडक्ट्सची घोषणा केली आहे. नवीन iOS सॉफ्टवेअरपासून ते कंपनीने आपला पहिला रिऍलिटी हेडसेट लॉन्च केला आहे. आता iOS 17 अपडेट रिलीज केले आहे. या अपडेटमध्ये आयफोन वापरकर्त्यांना कोणकोणते फीचर्स मिळणार आहेत ते पाहुयात.

Journal app

जर्नल App हे खरेतर अ‍ॅपलचे जुने अ‍ॅप आहे. मात्र कंपनीने याला पुन्हा एका नवीन अवतारामध्ये लॉन्च केले आहे. हे अ‍ॅप मशीन लर्निंगचा वापर करून वैयक्तिक सूचना देते. हे अ‍ॅप फोटो, लोकेशनवर्कआउटचे विश्लेषण करून वापरकर्त्यांना सुचना करते. याबाबतचे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
MuleHunter.AI rbi
आता सायबर फ्रॉडचा धोका टळणार; काय आहे ‘आरबीआय’चे ‘MuleHunter.AI’? ते कसे कार्य करणार?
Eight startups selected for National Quantum Mission and National Mission on Interdisciplinary Cyber ​​Physical Systems Pune news
क्वांटम तंत्रज्ञानासाठी नवउद्यमींना केंद्र सरकारचे बळ; देशातील आठ स्टार्टअप्समध्ये राज्यातील दोन स्टार्टअप्स
Dr Babasaheb Death Anniversary 2024
महामानवाला अभिवादन, दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटला!
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेला निसर्गाची प्रेरणा

हेही वाचा : WWDC 2023: iOS 17 बीटा रिलीज झालं, पण ‘या’ आयफोन्सला मिळणार नाही अपडेट, वाचा यादी

Passwords आणि Passkeys शेअरिंग

iOS 17 सह तुम्ही तुमच्या विश्वासातील लोकांना आपला पासवर्ड शेअर करू शकता. नवीन अपडेट आल्यानंतर तुम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये तुमचा पासवर्ड शेअर करू शकता आणि गृपमधील कोणताही सदस्य पासवर्ड एडिट करू शकतो.

Air Tag फीचर

AirTag हे फिचर आता पाच लोकांसह शेअर करता येईल. म्हणजे एकच एअरटॅगच्या मदतीने पाच लोकं आपले डिव्हाईस Find My App च्या मदतीने ट्रॅक करू शकणार आहेत. आता वापरकर्ते एअर टॅगचा ग्रुप देखील तयार करू शकता. त्यानंतर गृपचे सर्व सदस्य कोणत्याही डिव्हाइसचे लोकेशन पाहू शकणार आहेत. अलर्ट अलार्म वाजवू शकतील आणि लोकेशन पाहू शकतील.

Standby मोड

नवीन OS अपडेटसह स्टॅन्डबाय मोड लॉन्च करण्यात आला आहे. हा मोड वापरकर्त्यांना सर्व प्रकारची माहिती स्क्रीनमध्ये देणार आहे. तुम्ही तुमचा फोन चार्जिंगला लावलेला आहे नि तुम्ही त्यापासून दूर बसलेला असाल तर तेव्हा हा मोड उपयोगी ठरणार आहे. यामध्ये लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटी, सिरी, इनकमिंग कॉल्स यासारखी माहिती मिळणार आहे.

हेही वाचा : VIDEO: Samsung ने लॉन्च केला ‘हा’ तगडा स्मार्टफोन, १०८ MP चा कॅमेरा आणि…, एकदा फीचर्स पहाच

Apple ने iOS 17 हे अपडेट WWDC इवेंटमध्ये रिलीज केले आहे. iOS 17 सह ऑटोकरेक्ट हे फीचर आधीपेक्षा चांगले करण्यात आले आहे. आता स्पेस बारचा वापर करणे, टेक्स्ट टाईप करणे, वाक्यरचना तयार करणे हे पूर्वीपेक्षा अधिक वेगवान आणि सोपे होणार आहे. नवीन OS सह कीबोर्डची नवीन रचना देखील बघायला मिळणार आहे. यामुळे व्याकरणामध्ये होणाऱ्या चुका कमी होण्यास मदत होणार आहे.

NameDrop

Namedrop हे iOS 17 चे सर्वात खास फिचर आहे. Namedrop एअरड्रॉपसह काम करते. या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही कॉन्टॅक्टला कोणाशीही शेअर सोप्या पद्धतीने शेअर करू शकाल. दोन आयफोन किंवा Apple वॉच जवळ आणून देखील कॉन्टॅक्टस शेअर करता येणार आहेत.

Story img Loader