भारती एअरटेल भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वत मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील अनेक शहरांमध्ये कंपनीने आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. तसेच आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन प्रीपेड प्लॅन्स लॉन्च करत असते. एअरटेल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेटफ्लिक्सच्या ओटीटी फायद्यांसह आपले ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करत आहेत. देशामध्ये फायबर ब्रॉडबँड सेवा ऑफर करण्याबद्दल बोलले जाते तेव्हा यामध्ये एअरटेलची उपस्थिती ही व्यापक आहे. टेलिकॉम कंपनी एअरटेल एक्सट्रीम फायबर अंतर्गत फायबर ब्रॉडबँड सेवा देखील ऑफर करते.

एअरटेल कंपनी गेले तीन महिने वायरलाइन ग्राहक जोडत आहे. आता तुम्ही एअरटेल एक्सट्रीम फायबरच्या दोन प्लॅन्ससह नेटफ्लिक्स मिळवू शकता. परवडणाऱ्या प्लॅनमध्ये ही सुविधा नक्कीच तुम्हाला मिळू शकणार नाही. नेटफ्लिक्सला मोफत बंडल करणारे प्लॅन मिळवण्यासाठी तुम्हाला पअधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याबद्दलचे वृत्त telecomtalk ने दिले आहे. चला तर या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.

pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Zee Marathi Lakshmi Niwas Serial New Entry
Video : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! साकारणार ‘ही’ भूमिका, जबरदस्त प्रोमो आला समोर
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Paaru
Video: पारू-आदित्यमधील जवळीक वाढणार, अनुष्का दोघांची अहिल्याकडे तक्रार करणार, पाहा प्रोमो
Appi Aamchi Collector
Video : “अमोल म्हणजे आमचा जीव…”, एकीकडे अप्पी-अर्जुन लग्नबंधनात अडकणार अन् दुसरीकडे अमोलची साथ सुटणार? पाहा प्रोमो
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक

हेही वाचा : तुमचे डिटेल्स शेअर करण्यासाठी WhatsApp चे QR कोड फिचर कसे वापरायचे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

एअरटेल एक्सट्रीम फायबर : १,४९८ रुपयांचा प्लॅन

एअरटेल एक्सट्रीम फायबरचा १,४९८ रुपयांचा प्लॅन ३०० mbps पर्यंत स्पीड ऑफर करतो. हा प्लॅन वापरकर्त्यांना ३.३ टीबी मासिक डेटा ऑफर करतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स बेसिक, डिस्नी + हॉटस्टार, एक्सट्रीम प्रीमियम सेवा, व्हीआयपी सेवा, Apollo 24|7 Circle आणि Wynk Music प्रीमियम असे काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये कंपनीकडून मोफत लँडलाइन कनेक्शन देखील मिळते. लँडलाईन कनेक्शनसाठी ग्राहकांना इन्स्ट्रुमेंट स्वतंत्रपणे खरेदी करावे लागणार आहे. या प्लॅनच्या किंमतीमध्ये टॅक्सचा समावेश नाही आहे.

एअरटेल एक्सट्रीम फायबर : ३,३९९ रुपयांचा प्लॅन

एअरटेल एक्सट्रीम फायबरच्या ३,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ Gbps पर्यंत स्पीड (डाउनलोड आणि अपलोड) दोन्ही सह मिळतो. यात तुम्हाला ३.३ टीबी इतका मासिक डेटा कंपनी ऑफर करते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स बेसिक, डिस्नी + हॉटस्टार, एक्सट्रीम प्रीमियम सेवा, व्हीआयपी सेवा, Apollo 24|7 Circle आणि Wynk Music प्रीमियम असे काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात. वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये कंपनीकडून मोफत लँडलाइन कनेक्शन देखील मिळते. लँडलाईन कनेक्शनसाठी ग्राहकांना इन्स्ट्रुमेंट स्वतंत्रपणे खरेदी करावे लागणार आहे. या प्लॅनच्या किंमतीमध्ये टॅक्सचा देखील समावेश आहे. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा कंपनीच्या कोणत्याही जवळच्या रिटेल स्टोअरला भेट देऊन एअरटेल एक्सट्रीम फायबर कनेक्शन मिळवू शकता.

Story img Loader