Airtel ही देशातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओ नंतर एअरटेल कंपनीने देशामध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन रीचार्ज प्लॅन्स सादर करत असते. तसेच त्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स, रोजचे १ ते २ जीबी डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन देखील यामध्ये कंपनी देत असते. जर का तुम्ही एअरटेलचे सिमकार्ड हे दुय्यम नंबरसाठी वापरत असाल तरी देखील कंपनीचे काही प्लॅन्स तुम्हाला चांगल्या सुविधा देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही जर का एअरटेल कंपनीचे सिमकार्ड हे दुय्यम नंबर म्हणून वापरत असाल किंवा फक्त कॉलिंगसाठी याचा वापर करत असाल तर कंपनीचे २०० रुपयांच्या आतमध्ये असणारे देखील काही प्लॅन्स आहेत. जे इतर सेवांसह कॉलिंगची सुविधा देखील देतात. २०० रुपयांच्या आतमध्ये कंपनीचे कोणकोणते रीचार्ज प्लॅन आहे ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

हेही वाचा : Vodafone-Idea चा ग्राहकांना मोठा धक्का! ‘या’ दोन रीचार्ज प्लॅन्सची कमी केली वैधता, जाणून घ्या

एअरटेलचा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३० दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन STD आणि रोमिंग नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचे फायदे मिळतात. तसेच ३०० एसएमएस आणि ३ जीबी डेटा या प्लॅनमध्ये ऑफर केला जातो. तसेच Wynk आणि Hello Tunes मध्ये प्रवेश मिळतो.

एअरटेलचा १७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा १७९ रुपयांचा प्लॅन हा २०० रुपयांच्या आतमध्ये असणाऱ्या प्लॅनपैकी एक आहे. या प्लॅनची एकूण वैधता ही २८ दिवसांची आहे. यामध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, ३०० एसएमएस करण्याची सिविधा मिळते. त्यासह २ जीबी डेटा आणि Hello Tunes आणि Wynk Music वर प्रवेश देशील मिळतो.

हेही वाचा : Weekly Tech Updates: मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेल्या ‘जुगलबंदी’ चॅटबॉटपासून ते रिलायन्स जिओचा फॅमिली रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

एअरटेलचा १५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

यापूर्वी एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत ही ९९ रुपये होती. मात्र कंपनीने अनेक सर्कलमधून हा प्लॅन काढून टाकला. त्याची किंमत ५६ रुपयांनी वाढली. आता एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन हा १५५ रुपयांचा आहे. त्यामध्ये तुम्हाला २४ दिवसांची वैधता मिळणार आहे. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि एकूण १ जीबी डेटा वापरायला मिळतो. अतिरिक्त फायद्यांमध्ये Hello Tunes आणि Wynk Music वर प्रवेश देशील मिळतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel 199 179 and 155 rs recharge prepiad plans under 200 unlimited calling wync and hello tunes tmb 01