एअरटेल ही देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकांची टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेल कंपनीने देशभरात आपले ५जी नेटवर्क सुरू केले आहे. एअरटेलकडे असे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आहेत ज्यात ग्राहकांना अनेक फायदे मिळत असतात. तसेच कंपनीकडे असे काही प्रीपेड प्लॅन्स आहेत ज्यामध्ये वापरकर्त्यांना १ जीबी डेटा दररोज वापरायला मिळतो. हा प्लॅन अशा लोकांना फायदेशीर ठरतो जे बाहेर असताना डेटा वापरतात आणि ऑफिस व घरामध्ये वायफाय कनेक्टिव्हिटी वापरत असतात. तर एअरटेलकडे असे कोणते प्लॅन्स आहेत आणि त्यामध्ये कोणकोणते फायदे तुम्हाला मिळतात हे पाहुयात.

एअरटेलचा २६५ रुपयांचा प्लॅन

एअरटेलचा २६५ रुपयांच्या ट्रू अनलिमिटेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, तसेच दररोज १ जीबी डेटा वापरकर्त्यांना कंपनी ऑफर करते. तसेच या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये वापरकर्त्यांसाठी १ जीबी डेटा संपल्यानंतर त्याचा स्पीड हा ६४ KBPS इतका होईल. २८ दिवसांमध्ये रोज १०० एसएमएस वापरकर्त्यांना करता येणार आहेत. यामध्ये तुम्हाला एअरटेल थँक्सचे फायदे देखील मिळू शकतात. ज्या ठिकाणी ५ जी नेटवर्क आहे तेथील वापरकर्ते ५ जी इंटरनेटचा आनंद घेऊ शकणार आहेत. मोफत हॅलोट्यून्स, मोफत विंक म्युझिक असे फायदे देखील मिळणार आहेत. एअरटेल थँक्सच्या माध्यमातून एअरटेलचा २६५ रुपयांचा प्लॅन रिचार्ज केल्यास तुम्हाला २ जीबी डेटाचे एक विशेष App देखील मिळते. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

हेही वाचा : आता जगभरात भारताचा डंका; iPhone 15 सिरीजच्या ‘या’ मॉडेल्समध्ये ISRO चे GPS; जाणून घ्या…

एअरटेलचा २३९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या २३९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २४ दिवसांची वैधता मिळते. ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस असे फायदे मिळतात. याशिवाय एअरेटलच्या या प्लॅनमध्ये अतिरिक्त एअरटेल थँक्स रिवॉर्डचा देखील समावेश आहे. ५ जी नेटवर्क असणाऱ्या ठिकाणी वापरकर्ते ५ इंटरनेटचा आनंद घेऊ शकणार आहेत.

एअरटेलचा २०१ रुपयांचा प्लॅन

दररोज १ जीबी डेटा मिळणाऱ्या प्लॅन्समध्ये २३९ रुपयांच्या प्लॅनचा देखील समावेश आहे. मात्र यामध्ये वापरकर्त्यांना २१ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १ जीबी डेटा , दररोज १०० एसएमएस असे फायदे मिळतात. डेटा संपल्यानंतर त्याचा स्पीड हा ६४ kbps इतका होतो. हा प्लॅन देखील एअरटेल थँक्स रिवॉर्डसह येतो. तसेच मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचे फायदे देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत.