Airtel IPL Special Recharge Plan : सध्या सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची क्रेझ बघायला मिळते आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या टीमची मॅच बघण्यासाठी उत्सुक आहे. संध्याकाळी मॅच सुरू होण्यापूर्वी आपण प्रवासातसुद्धा असू शकतो. तसेच कधी कधी घरी आईला सीरियल बघायची असते. मग मोबाईलवर मॅच बघणे सोईस्कर ठरते. तर हे लक्षात घेता, अनेक कंपन्यासुद्धा यासाठी खास रिचार्ज प्लॅन ऑफर करीत आहेत.

आयपीएल चाहत्यांना क्रिकेट सामन्यांचा पूर्णपणे आनंद घेता यावा यासाठी जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शनचा पुरेसा डेटा आवश्यक आहे. अलीकडेच देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलने या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. एअरटेलची नवीन ऑफर म्हणजे ४५१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन, जो केवळ जिओहॉटस्टारमध्ये प्रवेशच देत नाही तर मोठ्या प्रमाणात डेटासुद्धा उपलब्ध करून देतो.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, हा एक डेटा व्हाउचर आहे, ज्याची कोणतीही सेवा वैधता नाही. या व्हाउचरसाठी युजर्सकडे ॲक्टिव्ह बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. एअरटेलच्या ४५१ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे…

एरटेलचा ४५१ रुपयांचा प्लॅन (Airtel 451 Rupees Recharge Plan) :

हा रिचार्ज प्लॅन ३० दिवसांसाठी वैध आहे, जो युजर्सना ५० जीबी डेटा आणि जिओहॉटस्टारचे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन देतो. एअरटेलने आयपीएल चाहत्यांसाठी खास बनवलेला तिसरा प्लॅन आहे. यापूर्वी कंपनीने १०० रुपये आणि १९५ रुपयांचे आणखी दोन डेटा व्हाउचर लाँच केले होते. १०० रुपयांच्या प्लॅनमध्ये ३० दिवसांच्या जिओहॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शनसह ५ जीबी डेटा , तर १९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये १५ जीबी डेटा, जिओहॉटस्टार मोबाइलचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळते.

ज्यांना JioHotstar सबस्क्रिप्शनसह इतर अनेक सेवा देणारा रिचार्ज प्लॅन हवा असेल त्यांच्यासाठी एअरटेलकडे ३,९९९ रुपये, ५४९ रुपये, १०२९ रुपये व ३९८ रुपयांचे अनेक प्लॅन उपलब्ध आहेत.

दरम्यान, भारती एअरटेलने ब्लिंकिटशी पार्टनरशिप करून फक्त १० मिनिटांत तुमच्या दाराशी सिम कार्ड पोहोचवण्याचा सोपा मार्ग प्रदान केला आहे. ही सेवा भारतातील १६ शहरांमध्ये उपलब्ध आहे. लोकांना मोबाईल सेवांशी जोडणे सोपे करणे हे या सेवेचे उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये इतर फोन नेटवर्कवरून कोणत्याही अडचणीशिवाय स्विच करण्याची क्षमता समाविष्ट आहे. ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना ४९ रुपये इतके छोटे शुल्क भरावे लागेल आणि त्यांचे सिम कार्ड सक्रिय होण्यासाठी एक छोटीशी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.