Bharti Airtel ही देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आहे. कंपनीने आपल्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमधून डिस्नी + हॉटस्टार मोबाइलचा फायदा काढून टाकला आहे . म्हणजे या प्लॅनमध्ये आता वापरकर्त्यांना डिस्नी + हॉटस्टार मोबाइल फ्ता येणार नाही. काही कालवधीपूर्वी या प्लॅनमध्ये वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Disney+ Hotstar मिळवण्यास पात्र होते. आता केवळ ३ प्लॅन्समध्ये हा फायदा मिळतो. ते प्लॅन ३,३५९, ८३९ आणि ४९९ रुपयांचे आहेत.
Airtel चा ३९९ रुपयांचा प्लॅन
Bharti Airtel च्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये आता Disney+ Hotstar मिळणार नाही. मात्र यामध्ये दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग , दररोज १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये एअरटेलकडून अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर केला जातो. तसेच यात Xstream Play, Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes आणि Wynk Music हे फायदे देखील मिळतात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
एअरटेल Disney+ Hotstar प्रीपेड प्लॅन्स
एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. दररोज १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग, Airtel Xstream Play, रोज ३ जीबी डेटा आणि ३ महिन्यांसाठी Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळते. तसेच अनलिमिटेड ५जी डेटा ऑफरसह Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes आणि Wynk Music देखील मिळेल.
एअरटेलच्या दुसऱ्या म्हणजेच ८३९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करता येतात. याची वैधता ८४ दिवसांची आहे. यात ग्राहकांना ५जी डेटा ऑफर केला जातो. 3 महिन्यांसाठी RewardsMini सबस्क्रिप्शन आणि Disney+ Hotstar Mobile मध्ये प्रवेश देखील मिळतो. Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes आणि Wynk Music चे सदस्यत्व देखील मिळते.
कंपनीच्या तिसऱ्या म्हणजेच ३,३५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २.५ जीबी दररोजचा डेटा, दररोज १०० एसएमएस,अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह एका वर्षाची वैधता त्यात मिळते. एका वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन देखील मिळते. वापरकर्त्यांना अपोलो 24|7 सर्कल, मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकमध्ये प्रवेशासह अमर्यादित 5G डेटा ऑफर देखील मिळते.