एअरटेल ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. एअरटेलकडे प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही रेंजमध्ये असे अनेक प्लॅन आहेत ज्या स्वस्त दरात उत्तम फायदे देतात. एअरटेलकडे पोस्टपेड श्रेणीमध्ये 399 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह योजना उपलब्ध आहेत. याशिवाय 499 रुपयांचा प्लॅटिनम पोस्टपेड प्लॅन देखील उपलब्ध आहे. एअरटेलचा हा ४९९ रुपयांचा प्लॅन प्राइम व्हिडीओ आणि हॉटस्टारच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.

एअरटेलचा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्सची ऑफर दिली जाते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण ७५ GB हाय-स्पीड डेटा देखील देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये २०० GB डेटा रोलओव्हर सुविधा देखील उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा संपल्यानंतर, ग्राहकांकडून २ पैसे प्रति एमबी दराने शुल्क आकारले जाते. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन आणि अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन देखील कोणत्याही अतिरिक्त पैशाशिवाय ऑफर केले जाते. ग्राहक डिस्ने प्लस हॉटस्टार सदस्यत्व १ वर्षासाठी आणि Amazon प्राइम व्हिडीओ ६ महिन्यांसाठी घेऊ शकतात.

आणखी वाचा : तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती तुमचे Whatsapp Chat वाचू शकणार नाही, ही ट्रिक वापरा!

Airtel कडे ३ फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहेत
याशिवाय एअरटेलकडे अनेक पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहेत. यामध्ये ३९९ रुपये, ९९९ रुपये, ११९९ रुपये, १५९९ रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. ३९९ रुपयांचा प्लॅन हा एकमेव एअरटेल प्लॅन आहे जो कोणतेही OTT सबस्क्रिप्शन देत नाही.

एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये कंपनी कुटुंबातील सदस्यांसाठी २ फ्री अॅड-ऑन व्हॉइस कनेक्शन ऑफर करते. या प्लॅनमध्ये दरमहा अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि १०० जीबी डेटा उपलब्ध आहे. हा प्लॅन डिस्ने+ हॉटस्टार १ वर्षासाठी आणि Amazon प्राइम मेंबरशिप ६ महिन्यांसाठी ऑफर करते.

आणखी वाचा : रंग बदलणारा नवा स्मार्टफोन Tecno Camon 19 Pro Mondrian Edition

एअरटेलच्या ११९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दरमहा अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १५० जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन, अॅमेझॉनचे प्राइम आणि डिज्नी+हॉटस्टार सब्सक्रिप्शन १ वर्षासाठी ऑफर केले जाते.

१५९९ रुपयांच्या प्लॅटिनम एअरटेल प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि २५० जीबी डेटा दरमहा दिला जातो. या प्लॅनमध्ये २०० GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स स्टँडर्ड सबस्क्रिप्शन, अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप आणि डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जातात.

Story img Loader