दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेलने भारतात 5G सेवा सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेला सुरुवात करण्यात आली असून ही सेवा सुरू झाल्यानंतर एअरटेलने जीओवर मात करीत देशातील आठ शहरात आपली 5G सेवा सुरू केली आहे. १ ऑक्टोबर २०२२ रोजी उद्घाटन कार्यक्रमादरम्यान भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी एअरटेलच्या 5जी सेवेची घोषणा केली. मात्र, ही एअरटेलची 5G सेवा वापरायची कशी हे आज आपण जाणून घेऊया.

एअरटेलची 5G सेवा १ ऑक्टोबरपासून दिल्ली, वाराणसी, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि सिलीगुडी येथे सुरू झाली आहे. मात्र, कंपनीने अद्याप नेमके ठिकाण किंवा सर्कल कोठे 5G सेवा सुरू केली आहे याबद्दल माहिती दिलेली नाही.

एअरटेल 5G असे तपासा

Airtel वापरकर्ते त्यांच्या 5G स्मार्टफोन्सवर Airtel Thanks अॅपच्या मदतीने त्यांच्या आसपास 5G नेटवर्कची उपलब्धता तपासू शकतात.

आणखी वाचा : अरे वा! जीओच्या क्लाउड गेमिंग तंत्रज्ञानामुळे, एंट्री लेव्हल 5G मोबाईलसह गेमर आता हाय-एंड गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकणार; जाणून घ्या सविस्तर

5G वापरण्यासाठी काय आवश्यक असेल

5G नेटवर्क : 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रात 5G नेटवर्कची आवश्यकता असेल. एअरटेलने आधीच सांगितले आहे की सध्या त्यांची 5G सेवा फक्त काही ठिकाणी उपलब्ध आहे जिथे त्यांचे 5G टॉवर स्थापित आहेत.

5G स्मार्टफोन : 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला 5G सुसंगत स्मार्टफोनची आवश्यकता असेल.

एअरटेल 5G सेवा या पद्धतीने करा सक्रिय

एअरटेलने पुष्टी केली आहे की त्यांचे विद्यमान 4G सिम 5G तयार आहे. या प्रकरणात, 5G सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नवीन सिमची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून 5G सक्रिय करू शकता.

१. 5G सक्रिय करण्यासाठी, फोनच्या सेटिंग्ज अॅपवर जा.
२. येथे तुम्हाला कनेक्शन्स किंवा मोबाईल नेटवर्क पर्याय दिसेल.
३. या पर्यायावर जाऊन, तुम्हाला 5G/4G/3G/2G म्हणून नेटवर्क मोड निवडण्याचा पर्याय दिसेल.
४. 5G निवडून, तुम्ही आपोआप 5G सुरू कराल. तुमच्या परिसरात एअरटेलचे 5G नेटवर्क असल्यास, तुम्हाला 5G लोगो दिसेल.

Story img Loader