देशात ५जी सेवा लाँच झाल्यानंतर सर्व कंपन्या ५जी सेवेच्या चाचण्या करत आहेत. एअरटेल ५जी नेटवर्क गेल्या महिन्यात लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक स्मार्ट फोनला याचा सपोर्ट मिळू लागला आहे. अशातच एअरटेलने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. आता OnePlus आणि Oppo च्या स्मार्ट फोन्सवर Airtel ५जी सेवेचा वापर करता येणार आहे. एका रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. परंतु, दोन्हीपैकी कोणत्याही स्मार्टफोन ब्रँडने अधिकृत माहिती दिली नाही.
एअरटेलने देखील याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही परंतु, अहवालात असे म्हटले आहे की, वनप्लस आणि ओप्पोच्या सर्व ५जी स्मार्टफोनची यादी त्यांच्या वेबसाइटवर पाहिली जाऊ शकते. याचा अर्थ या कंपन्यांच्या सर्व ५जी फोनवर एअरटेल ५जीचा आनंद घेता येईल.
आणखी वाचा : Samsung Galaxy S23 series: लवकरच होणार लाँच; स्मार्टफोनचे डिझाइनही आले समोर, पाहा कसा दिसतोय ‘हा’ स्मार्टफोन
एअरटेल ५जी ला सपोर्ट करणारे ONEPLUS 5G फोन्स
एअरटेल ५जी साठी समर्थन मिळवण्यासाठी नवीनतम फोनच्या यादीमध्ये OnePlus 8, OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus Nord 2 आणि OnePlus 9R यांचा समावेश आहे. याचा अर्थ असा की, एअरटेलच्या ५जी NSA म्हणजेच नॉन-स्टँडअलोन नेटवर्कला सपोर्ट करणारे पुढील सर्व OnePlus स्मार्टफोन्स आहेत .
OnePlus 9 Pro, OnePlus Nord CE OnePlus Nord, OnePlus 9, OnePlus Nord CE Lite 2, OnePlus 10R, OnePlus Nord, CE2 आहेत. OnePlus 10 Pro 5G, OnePlus Nord 2T, OnePlus 10T, OnePlus 9RT, OnePlus 8, OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus Nord 2 आणि OnePlus 9R.
एअरटेल ५जी ला सपोर्ट करणारे OPPO 5G फोन
सर्व Oppo उपकरणे आता भारती एअरटेलच्या ५जी नेटवर्कला सपोर्ट करतात. ओप्पो त्याच्या उपकरणांसाठी वेगाने अपडेट आणत आहे. अलीकडेच, ज्या Oppo उपकरणांना Airtel 5G साठी सपोर्ट मिळाला आहे ते Oppo F19 Pro Plus, Oppo Reno5G Pro, Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro, Oppo A53s, Oppo A74, Oppo Reno 7 Pro 5G, Oppo F21 Pro 5G, Oppo Reno 7, Oppo Reno 8, Oppo Reno 8 Pro, Oppo K10 5G आणि Oppo F21s Pro 5G हे स्मार्टफोन्स आहेत.