Airtel Affordable Plan Details : सध्या दिवसभरातील अनेक कामे मोबाईलच्या मदतीने केली जातात. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पासाठी माहिती शोधणे, कॉलेज प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरणे, ऑफिसची मिटिंग अटेंड करणे आदी अनेक गोष्टींसाठी आपण मोबाईलचा उपयोग करतो. पण, या सगळ्यासाठी मोबाईलमध्ये नेट असणे गरजेचे असते. त्यामुळे एअरटेल, व्हीआय, जिओ या कंपन्या आपल्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात.
तर भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल, विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. कंपनी दीर्घकालीन वैधतेसह अनेक बजेट-फ्रेंडली रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. जर तुम्ही एअरटेल युजर असाल आणि तुम्हाला वारंवार रिचार्ज करणे आवडत नसेल, पण जास्त डेटा पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीचा ८४ दिवसांचा प्लॅन घेण्याचा विचार करू शकता. या प्लॅनबरोबर तुम्हाला विनामूल्य ओटीटी सबस्क्रिप्शनसह भरपूर दैनिक डेटा दिला जाईल.
एअरटेलचा १,१९९ रुपयांचा प्लॅन (Airtel Affordable Plan)
एअरटेलकडून हा प्लॅन तुमच्या सर्व दूरसंचार गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज १०० मोफत एसएमएस, दररोज २.५ जीबीसह एकूण २१० जीबी डेटाचा आनंद घेता येऊ शकतो. दैनिक मर्यादा ओलांडली तरीही तुम्ही 64kbps गतीने इंटरनेट वापरू शकता.
मोफत ओटीटी आणि इतर फायदे (Airtel Affordable Plan) :
हा प्लॅन ओटीटी पाहणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण यामध्ये ॲमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन, विंक म्युझिक ॲक्सेस प्रवेश दिला जाईल.
एअरटेलचा १,१९९ रुपयांचा प्लॅन का निवडावा? (Airtel Affordable Plan)
एअरटेलचा हा प्लॅन स्वस्तात मस्त, दीर्घकालीन वैधता आणि प्रीमियम फायद्यांनी भरपूर आहे. भरपूर डेटा आणि विनामूल्य ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये ज्यांना प्रवेश हवा असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय ठरेल.