Airtel Brings Back Affordable Recharge : जिओ, व्हीआय (वोडाफोन-आयडिया) व एअरटेल या प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्लॅन्स ऑफर करत असतात. प्रत्येक कंपनीने आपल्या प्लॅनचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे. जसे की, एक दिवसाचा, एका महिन्याचा, दोन ते तीन महिन्यांचा किंवा एक वर्षाचा. तर कंपनीच्या अनेक पर्यायांमधून ग्राहक त्यांच्या सोईच्या प्लॅनची निवड करतात. रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या खर्चामुळे, वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास कमी करण्यासाठी काही युजर्स तीन महिने किंवा वर्षभराच्या रिचार्ज प्लॅनकडे वळत आहेत. तर हेच लक्षात घेऊन एअरटेलने काही प्लॅन्स ग्राहकांसाठी सादर केले आहेत (Airtel Affordable Recharge). त्यापैकी एक म्हणजे तीन हजार ९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन.
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनेक फायदे आहेत. तीन हजार ९९९ रुपयांचा हा प्लॅन ३६५ दिवसांची वैधता प्रदान करतो आणि ओटीटी फायदे तुम्हाला देतो (Airtel Affordable Recharge). त्याचबरोबर तुम्ही या प्लॅनसह वर्षभर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज १०० मोफत एसएमएसचा आनंद घेऊ शकता.
त्याचबरोबर या प्लॅनमध्ये मोबाईल डेटाच्या बाबतीत युजर्सना अनेक फायदे मिळतील. कारण- हा प्लॅन दररोज तुम्हाला २.५ जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर करतो. म्हणजेच वर्षभरात एकूण ७३० जीबी तुम्हाला प्रदान करेल. हा प्लॅन जास्त इंटरनेट वापरणाऱ्या युजर्ससाठी खूप सोईचा आहे. त्याशिवाय प्लॅनमध्ये अमर्यादित ५ जीडेटा अॅक्सेसचा समावेश आहे. तुमच्या परिसरात ५जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध असल्यास तुम्हाला याचा लाभ घेता येईल.
डिस्नी प्लस, हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन (Airtel Affordable Recharge)
ज्यांना वेब सीरिज, वेगवेगळे चित्रपट किंवा मालिका बघायला खूप आवडत असेल त्यांच्यासाठी एअरटेलचा हा प्लॅन जबरदस्त फायदे देणारा आहे. कारण- हा प्लॅन डिस्नी प्लस हॉटस्टारचे विनामूल्य एक वर्षाचे सबस्क्रिप्शन देते आहे. याव्यतिरिक्त एअरटेल स्ट्रीमद्वारे युजर्स विविध टीव्ही शो, चित्रपट व थेट चॅनेलमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रवेश करू शकतात.