Airtel Offer free Apple TV+ Airtel free Apple Music To Customers : एअरटेल (Airtel) सर्व प्रकारच्या (प्रीपेड आणि पोस्पेड) युजर्ससाठी रिचार्ज प्लान लाँच करत असते. अगदी एअरटेलचा वाय-फाय प्लॅन, एअरटेलचा प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन आदी अनेक रिचार्ज प्लॅन उपल्बध आहेत. पण, आता कंपनी ग्राहकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. अ‍ॅपल टीव्ही प्‍लस आणि अ‍ॅपल म्युजिक (Apple TV+ and Apple Music) चा लाभ ग्राहकांना घेता यावा यासाठी भारती एअरटेल आणि ॲपल यांनी पार्टनरशिप केली आहे. सर्व एअरटेल वायफाय ग्राहकांना ९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या होम वाय-फाय प्लॅन्सवर अ‍ॅपल टीव्ही प्‍लसच्या कंटेंटमध्ये मोफत प्रवेश मिळेल. त्याचबरोबर प्रवास करताना एकाधिक डिव्हाइसेसवर तुम्ही हा कन्टेन्ट पाहू शकणार आहत. याव्यतिरिक्त, पोस्टपेड ग्राहक ९९९ रुपये पासून सुरू होणाऱ्या प्लॅनवर अ‍ॅपल टीव्ही प्‍लस आणि अ‍ॅपल म्युजिकमध्ये सहा महिन्यांसाठी प्रवेश मिळेल.

एअरटेलच्या (Airtel) ॲपल बरोबरच्या या पार्टनरशिपमुळे ग्राहकांना खास प्रीमियम, नाटक (ड्रामा) आणि विनोदी मालिका (कॉमेडी सीरिज), कथाचित्रपट (फीचर फिल्म्स), अभूतपूर्व माहितीपट (डॉक्युमेंटरी) आणि मुलांचे व कौटुंबिक मनोरंजनसुद्धा होईल. याव्यशिवाय, ॲपल म्युझिकची इंग्रजी, हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये अनमॅच लायब्ररी एक अद्वितीय ऑडिओ अनुभव देईल.

या पार्टनरशिपसह ग्राहकांना सर्व ॲपल टीव्ही प्लसच्या मालिका, चित्रपट जाहिरात ॲड-फ्री पाहण्याचा आनंद उचलता येणार आहे आणि त्यात ‘टेड लासो’, ‘सेव्हरेन्स’, ‘द मॉर्निंग शो’, ‘स्लो हॉर्स’, ‘सायलो’ आणि ‘डिस्क्लेमर’ यांसारख्या पुरस्कार विजेत्या हिट मालिका तसेच ‘वुल्फ्स’ आणि ‘द गॉर्ज’ यांसारखे ताजे चित्रपटदेखील तुम्हाला पाहता येणार आहेत. याशिवाय ग्राहकांना ॲपल म्युझिकमध्ये सहा महिने विनामूल्य प्रवेश उपलब्ध असेल; ज्यात कलाकारांच्या मुलाखती, ॲपल म्युझिक रेडिओबरोबर ॲपल म्युझिक सिंक आणि टाइम-सिंक केलेले लिरिक्स उपलब्ध असणार आहेत.

होम वाय-फाय प्लॅन्स…

प्लॅन्सस्पीडटीव्ही बेनेफिट्सओटीटी बेनेफिट्स
९९९ रुपये२०० Mbps पर्यंतॲपल टीव्ही प्लस, झी ५, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, २३ प्लस ओटीटी आणि बरंच काही
१०९९ रुपये२०० Mbps पर्यंत३५० प्लस चॅनेल्स (एचडी)ॲपल टीव्ही प्लस, झी ५, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, २३ प्लस ओटीटी आणि बरंच काही
१५९९ रुपये३०० Mbps पर्यंत३५० प्लस चॅनेल्स (एचडी)ॲपल टीव्ही प्लस, झी ५, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, २३ प्लस ओटीटी आणि बरंच काही
३९९९ रुपये१ Gbps पर्यंत३५० प्लस चॅनेल्स (एचडी)ॲपल टीव्ही प्लस, झी ५, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, २३ प्लस ओटीटी आणि बरंच काही

प्रीपेड प्लॅन्स

प्लॅन्सडेटा बेनिफिट्सॲड ऑन सिम्सओटीटी बेनिफिट्स
९९९ रुपये१५० जीबीॲपल टीव्ही, ॲपल म्युजिक, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले अनलिमिटेड ( २० प्लस ओटीटी)
११९९ रुपये१९० जीबीॲपल टीव्ही, ॲपल म्युजिक, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले अनलिमिटेड ( २० प्लस ओटीटी)
१३९९ रुपये२४० जीबीॲपल टीव्ही, ॲपल म्युजिक, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले अनलिमिटेड ( २० प्लस ओटीटी)
१७४९ रुपये३२० जीबीॲपल टीव्ही, ॲपल म्युजिक, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले अनलिमिटेड ( २० प्लस ओटीटी)

ॲपल टीव्ही+ आणि ॲपल म्युझिकची भर घालून ॲमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, झी5 आणि जिओ हॉटस्टारसारख्या प्रमुख स्ट्रीमिंग कंपन्यांसह एअरटेलची (Airtel) पार्टनरशिप ग्राहकांना चुटकीसरशी मनोरंजनाच्या पर्यायांचा अप्रतिम खजिना उपलब्ध करून देईल, म्हणून एअरटेल आपल्या ग्राहकांना डिजिटल जीवनशैली अनुभव प्रदान करण्यात नेहमीच पहिल्या नंबरवर असते हे सिद्ध झाले आहे.

Story img Loader