भारतात सध्या ५ जी नेटवर्क सुरू झाले आहे. ५जी लाखो लोकांना देशामध्ये विजेच्या वेगाने डाउनलोड, स्ट्रीमिंग आणि अखंड व्हिडीओ कॉल आणि अनलिमिटेड कनेक्टिव्हीटी ऑफर करत आहे. आता वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनवर गोष्टी लोड होण्यासाठी फार वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. तसेच ऑनलाइन गेमिंग पहिल्यापेक्षा सोपे झाले आहे.
५जी हे फक्त मनोरंजनापुरतेच मर्यादित आहे. ५जी विद्यार्थी आणि व्यावसायिकांना कनेक्ट राहण्यास सक्षम करत आहे. आज ६,२०० शहरांमध्ये उपलब्ध आहे. त्याचा अवलंब करण्यास वेग देण्यासाठी Airtel आणि Jio सारख्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या पोस्टपेड आणि प्रीपेड वापरकर्त्यांना अनलिमिटेड ५जी प्लॅन्स ऑफर करते. कोणत्याही रिचार्ज प्लॅनसह पोस्टपेड वापरकर्ते एअरटेल आणि जिओ वरून ५जी डेटा ऍक्सेस करू शकतात. मात्र प्रीपेड वापरकर्त्यांना काही निर्बंध आहेत. जिथे 1Gbps पर्यंत डाउनलोड स्पीड आणि कमी नेटवर्क लेटन्सीसह अमर्यादित 5G डेटाचा आनंद घेण्यासाठी २३९ रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे.
५जी डेटाचे महिन्याचे प्लॅन
एअरटेल आणि जिओ दोन्ही कंपन्या अनलिमिटेड ५जी डेटासह २३९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. तसेच एअरटेल दररोज १ जीबी डेटा ४जी स्पीडमध्ये २४ दिवसांच्या वैधतेसाठी ऑफर करते. तर जिओ दिवसाला २ जीबी ४जी स्पीडमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसाठी ऑफर करते.
५जी डेटाचे तिमाही प्लॅन
एअरटेलच्या तिमाही प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. त्यात १.५जीबी ४जी डेटा मर्यादेसह येतो. तसेच अनलिमिटेड ५जी डेटाची किंमत ही ७१९ रुपये आहे. जिओकडे १.५ जीबी ४जी डेटा कॅप आणि अनलिमिटेड ५जी डेटा प्रवेशासह समान ८४ दिवसांची वैधता असलेला प्लॅन आहे. ७३९ रुपयांचा प्लॅन हा एअरटेलपेक्षा थोडासा महाग आहे.
५जी डेटाचे वार्षिक प्लॅन
एअरटेलच्या सर्वात परवडणाऱ्या वार्षिक रिचार्ज प्लॅनची किंमत १,७९९ रुपये आहे. मात्र या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा मिळत नाही. एअरटेलचा दुसरा २,९९९ रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लॅन अनलिमिटेड 5G डेटा ऍक्सेस ऑफर करतो. त्याचप्रमाणे जीओचा एक वर्षाची वैधता असलेला प्लॅन हा २,४५४ रुपयांचा आहे. ज्यात अनलिमिटेड ५जी डेटा मिळतो.