भारतात सध्या ५जी नेटवर्क सुरू झाले आहे. हे ५जी नेटवर्क लाखो लोकांना देशामध्ये अनेक गोष्टी वेगात डाऊनलोड करणे, स्ट्रीमिंग व अखंड व्हिडीओ कॉल आणि अनलिमिटेड कनेक्टिव्हिटी ऑफर करीत आहे. भारतात ५जी सेवा सुरू होऊन बरेच महिने झाले आहेत. Airtel आणि Jio या भारतातील दोन टेलिकॉम कंपन्या अशा आहेत की, ज्यांनी या भारतात पहिल्यांदा 5G सेवा सुरू केली. पण, या दोन्ही कंपन्यांनी अद्याप ५जी प्लॅन्स जारी केलेले नाहीत. याचा अर्थ असा की, अद्याप कोणतेही वापरकर्ते ५जी प्लॅन न घेता, ५जी स्पीड नेटवर्कचा लाभ घेत आहेत.

जिओ आणि एअरटेल या कंपन्या एक वर्षाहून अधिक काळ मोफत ५जी डेटा ग्राहकांना पुरवीत आल्या आहेत. आता या कंपन्या प्रीमियम ग्राहकांना मोफत अमर्यादित ५जी सेवा देणे बंद करणार आहेत. म्हणजेच २०२४ या वर्षात ग्राहकांना ५जी डेटा वापरण्यासाठी ५ ते १० टक्के जास्त किंमत द्यावी लागणार आहे. दोन्ही कंपन्या ५जीसाठी वेगळे प्लॅन्स जाहीर करणार आहेत.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा…प्रतीक्षा संपली! ग्राहकांना सॅमसंग Galaxy च्या ‘या’ स्मार्टवॉचमध्ये मिळणार हेल्थ फीचर्स…

जिओ आणि एअरटेल कंपनीचे ५जी प्लॅन्स ४जीच्या तुलनेत ५ ते १० टक्के जास्त महाग असण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांनी ५जीमध्ये केलेली गुंतवणूक पाहता, हे दोन्ही दूरसंचार ऑपरेटर्स त्यांच्या भांडवलावरील लाभ / रिटर्न ऑन कॅपिटल एम्पलॉयड (ROCE) सुधारण्यासाठी २०२४ च्या सप्टेंबर तिमाहीत रिचार्ज प्लॅनमध्ये २० टक्के वाढ करतील, अशी शक्यता उद्योगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांचे मिळून १२५ दशलक्ष ग्राहक आहेत. तर ५जी प्लॅन्स कसे असतील हे पाहू…

१. ५जी योजना खरेदी करण्यासाठी वापरकर्त्यांना पाच ते दहा टक्क्यांपर्यंत जास्त खर्च करावा लागू शकतो.
२. ५जी प्लॅनमध्ये ४जी प्लॅनच्या तुलनेत ३० टक्के जास्त इंटरनेट डेटा दिला जाऊ शकतो.
३. सध्या 4G प्लॅनमध्ये सामान्यतः 1.5GB ते 3GB प्रतिदिवस डेटा प्लॅन दिला जातो. पण, ५जी प्लॅनमध्ये सुमारे 2GB ते 4GB प्रतिदिन डेटा प्लॅन दिला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.