भारती एअरटेल लिमिटेह ही भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये टेलिकॉम सेवा पुरवणारी एक मल्टिनॅशनल कंपनी आहे. तर आता एअरटेलने ग्राहकांसाठी विमान प्रवासात वापरण्यासाठी (इन-फ्लाइट) रोमिंग योजना सादर केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना विमानात असतानाही मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट राहता येईल. एअरटेलचे युजर्स आता हाय-स्पीड इंटरनेट ब्राउझिंगचा आनंद घेऊ शकतात व विमान प्रवासातसुद्धा त्यांच्या प्रियजनांशी बोलू शकतात आणि उड्डाण करताना सोशल मीडियाचाही आनंद घेऊ शकतात.
एअरटेलने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी तीन, तर पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी तीन असे रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत.
प्रीपेड प्लॅन्स :
१९५ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन (Postpaid Plan) : हा प्लॅन ग्राहकांना २५० एमबी डेटा, १०० मिनिटे आउटगोइंग कॉल आणि १०० एसएमएस प्रदान करतो. हे सर्व २४ तासांसाठी वैध आहे. हे डेटा, व्हॉईस मिनिट आणि एसएमएस आदींचे मिश्रण ऑफर करते, जे ग्राहकांना त्यांच्या विमान प्रवासादरम्यान कनेक्टिव्हिटीची गरज लागते त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे. तसेच डेटा संपण्याची किंवा कॉल मिनिटांची चिंता न करता इतर त्यांच्या प्रियजनांशी कनेक्ट राहू शकतात.
२९५ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन (Postpaid Plan) : या प्लॅनमध्ये १०० मिनिटांचे आउटगोइंग कॉल्स आणि १०० एसएमएससह ५०० एमबी डेटा दिला जातो; हे सर्व २४ तासांसाठी वैध आहे. हा प्लॅन जास्त डेटा वापरणाऱ्या युजर्ससाठी योग्य ठरेल.
५९५ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन (Postpaid Plan) :
या प्रीमियम ऑफर प्लॅनची किंमत ५९५ रुपये आहे. ही योजना ग्राहकांना १ जीबी डेटा, १०० मिनिटे आउटगोइंग कॉल आणि १०० SMS प्रदान करते; हे सर्व २४ तासांसाठी वैध आहे. जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा ऑफर प्लॅन लाँच केला आहे. स्ट्रिमिंग व्हिडीओ, क्लाउड सेवांमध्ये प्रवेश करणे, सोशल मीडियावर सक्रिय राहणे आदी गोष्टींसह युजर्स कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात.
हेही वाचा…‘DP’ चा स्क्रीनशॉट घेताय ? तर थांबा, ‘या’ ॲपमध्ये होणार मोठा बदल; थेट युजरला जाणार नोटिफिकेशन
प्रीपेड प्लॅन्स :
१९५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) : हा प्रीपेड प्लॅन २५० एमबी डेटा, १०० मिनिटे आउटगोइंग कॉल्स आणि १०० एसएमएस ऑफर करतो. हे सर्व २४ तासांसाठी वैध आहे. कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी किंवा अत्यावश्यक ऑनलाइन सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी ही योजना ग्राहकांसाठी खास ठरेल.
२९५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) : या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ५०० चा वाढीव डेटा, १०० मिनिटे आउटगोइंग कॉल्स आणि १०० एसएमएस प्रदान केले जातात, हे सर्व २४ तासांसाठी वैध आहे.
५९५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) : यामध्ये १ जीबी डेटा, १०० मिनिटे आउटगोइंग कॉल्स आणि १०० एसएमएसचा समावेश असणार आहे; ज्याचा कालावधी २४ तास असणार आहे. प्रीपेड योजनांमध्ये हा प्लॅन ग्राहकांना सर्वाधिक डेटा प्रदान करतो आहे. तर विमान प्रवासातील ग्राहकांसाठी हे प्लॅन्स एअरटेलने लाँच केले आहेत.