Airtel Budget Friendly Prepaid Plan : मोबाईलमध्ये रिचार्ज करताना आपण सर्वप्रथम एखादा प्लॅन किती दिवसांसाठी वैध आहे, त्यात किती डेटा मिळेल आणि त्यात कोणत्या सबस्क्रिप्शनचा समावेश आहे ते पाहतो. एकूणच आपल्याला रिचार्ज करावयाच्या ‘त्या’ प्लॅनमधून किती आणि कसा अधिक फायदा मिळेल आदी सगळ्या बाबींचा आपण शोध घेत असतो. जर तुम्हीही अशाच प्लॅनच्या शोधात असाल, तर आम्ही तुम्हाला एका भन्नाट प्लॅनची माहिती देणार आहोत.
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी ‘एअरटेल’ आपल्या युजर्ससाठी परवडणारे आणि प्रीमियम रिचार्ज प्लॅन ऑफर करीत असते. ग्राहकांच्या सोई वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून, कंपनीने दुर्गम भागात इंटरनेट सुविधा प्रदान करण्यासाठी एलॉन मस्कच्या ‘स्टारलिंक’शी भागीदारी केली आहे. त्याव्यतिरिक्त एअरटेल अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निवडक रिचार्ज प्लॅनसोबत आता ओटीटी सबस्क्रिप्शनची जोड देत आहे. अशाच एका प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग, डेटा व अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन ग्राहकांना दिले जाणार आहे.
एरटेलचा ८४ दिवसांचा प्लॅन (Airtel 84 Days plan)
एअरटेलने १,१९९ रुपयांचा एक बजेट-फ्रेंडली प्रीपेड प्लॅन सादर केला आहे, ज्याची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनसह युजर्स सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. त्याव्यतिरिक्त ग्राहकांना दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात, ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ एकमेकांशी संवाद साधू शकता.
८४ दिवसांसाठी २१० जीबी
ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्रीपेड प्लॅन बेस्ट ठरेल. कारण- हा प्लॅन ८४ दिवसांसाठी २१० जीबी डेटा देतो, ज्यामुळे युजर्स दररोज २.५ जीबी डेटाचा आनंद घेऊ शकतात. एअरटेल ५जी नेटवर्क उपलब्ध असलेल्या प्रदेशांमध्ये हा प्लॅन अमर्यादित ५जी डेटादेखील प्रदान करतो.
जर तुम्हाला नवीन चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याची आवड असेल, तर हा प्लॅन तुम्हाला आणखी एक अतिरिक्त फायदा देईल. म्हणजेच ८४ दिवसांसाठी मोफत Amazon Prime सबस्क्रिप्शन. त्यामुळे युजर्सचा OTT सबस्क्रिप्शन खरेदी करण्याचा अतिरिक्त खर्च वाचतो. पण, ही प्राइम सदस्यता एकाच डिव्हाइसपुरती मर्यादित असेल हे मात्र लक्षात ठेवावे. तेव्हा तुम्हाला भरपूर डेटा, अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन हवे असेल, तर तुम्ही हा रिचार्ज प्लॅन नक्की ट्राय करू शकता.