Airtel Prepaid Plans : एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. TRAI च्या आदेशानंतर एअरटेलने ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन आणले आहेत. त्यामुळे डेटा वापर नसलेल्या आणि फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना एअरटेलचे हे प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. एअरटेलने सादर केलेल्या या दोन नवीन प्लॅन्सच्या किमती अनुक्रमे ४९९ व १९९९ रुपये अशा आहेत. पण या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत ते जाणून घेऊ….

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने सर्व मोबाईल ऑपरेटर्सना केवळ कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन सुरू करण्याचे आदेश दिले होते; जेणेकरून इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना फायदा होऊ शकेल. ट्रायच्या या आदेशानंतर एअरटेलने असे प्लॅन आणले आहेत की, ज्यामध्ये युजर्सना फक्त कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळेल.

Airtel affordable recharge plan
Airtel Affordable Recharge: वर्षभर रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर; मोफत मिळेल डिस्नी प्लस, आणि हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन, जाणून घ्या एअरटेलच्या ‘या’ खास प्लॅन्सबद्दल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला असता तर…
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
dharavi adani land loksatta
३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी
Mother throw the child for reel woman Dance video viral on social media
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Add Music to your WhatsApp Status
WhatsApp Upcoming Feature: स्टेटस, लाईकनंतर आता व्हॉट्‌सॲपमध्ये जोडलं जाणार इन्स्टाग्रामचे ‘हे’ फीचर; फोटो, व्हिडीओला बनवेल आणखीन आकर्षक

एअरटेलने फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी दोन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. तुम्ही ५०९ आणि १९९९ रुपये अशा अनुक्रमे किमतीनुसार तुम्हाला हवा तो प्लॅन तुम्ही रिचार्ज करू शकता.

एअरटेलचा ५०९ रुपयांचा प्लॅन (Airtel’s Rs 509 Recharge Plan)

एअरटेलच्या ५०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि ९०० फ्री एसएमएसची सुविधा मिळेल. त्यासह तुम्हाला Apollo 24/7 चे मोफत सबस्क्रिप्शनदेखील मिळेल. त्यामध्ये तुम्ही मोफत हॅलो ट्यूनचाही लाभ घेऊ शकता. एअरटेल याआधी याच प्लॅनमध्ये याच किमतीत 6GB डेटाची ऑफर देत होता.

एअरटेलचा १९९९ रुपयांचा प्लॅन (Airtel’s Rs 1999 Recharge Plan)

एअरटेलचा १९९९ रुपयांचा प्लॅन ३६५ दिवसांच्या म्हणजेच एक वर्षाच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये युजरला अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० फ्री एसएमएसची सुविधा दिली आहे. त्यासह तुम्हाला Apollo 24/7 सर्कल मेंबरशिप आणि मोफत Hello Tunes ची सुविधा मिळेल. एअरटेल याआधी या प्लॅनमध्ये याच किमतीत 24GB चा डेटा देण्यात येत होता.

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. परंतु, प्लॅन्सच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. प्लॅनमधील फक्त डेटाची सुविधा काढून टाकली आहे. त्यामुळे ग्राहकांनी रिचार्ज प्लॅन खरेदी करताना थोडी काळजीपूर्वक निवड करावी.

Story img Loader