Airtel IPTV Service Provide Various Plans : तुम्ही एअरटेल युजर असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलने भारतातील २,००० शहरांमध्ये इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन (IPTV) सेवा सुरू केली आहे. या नवीन ऑफरमध्ये ३५० लाइव्ह टीव्ही चॅनेल्सची सुविधा, तसेच ब्रॉडबँड प्लॅन निवडल्यास २९ ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. युजर्स त्यांच्या ब्रॉडबँड प्लॅनसह एकत्रित केलेल्या या सेवेचा आनंद घेऊ शकतात, ज्यामध्ये ४० Mbps ते १ Gbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड आहे. एअरटेलच्या IPTV सेवा लाँचिंगपूर्वी बीएसएनएलनेसुद्धा काही महिन्यांपूर्वी फायबर ब्रॉडबँड-आधारित IFTV सेवाही सुरू केली होती.
एअरटेलच्या आयपीटीव्ही ब्रॉडबँड प्लॅनची किंमत स्टँडर्ड प्लॅनच्या किमतीपेक्षा २०० रुपये जास्त आहे, ज्यामुळे युजर्सना हाय-स्पीड इंटरनेटसह लाइव्ह टीव्ही चॅनेलसुद्धा मिळतात. पॅकेजचा एक भाग म्हणून सबस्क्रायबर्सना अनेक लोकप्रिय ओटीटी ॲप्सचा ॲक्सेसदेखील मिळेल. या सुरुवातीच्या ऑफरचा फायदा घेणाऱ्यांसाठी एअरटेल थँक्स अॅपद्वारे कोणताही प्लॅन खरेदी केल्यास, एअरटेल युजर्स ३० दिवस मोफत IPTV सेवेचा आनंद घेऊ शकतात.
नवीन Airtel Wi-Fi प्लॅन खरेदी केल्यावर सर्व नवीन Airtel ग्राहक IPTV चा आनंद घेऊ शकतात. ग्राहक Airtel च्या वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा Airtel च्या कोणत्याही स्टोअरला भेट देऊ शकतात. सध्याचे Airtel Wi-Fi ग्राहक आपला प्लॅन IPTV प्लॅनमध्ये अपग्रेड करू शकतात…
तर कसे आहेत एअरटेलच्या इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन सेवेचे प्लॅन्स (Airtel IPTV Service) …
६९९ रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये युजर्सना ४० एमबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा, २६ ओटीटी ॲप्स आणि ३५० लाइव्ह टीव्ही चॅनेलची सुविधा दिली जाते.
८९९ रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये युजर्सना १०० एमबीपीएसचा इंटरनेट स्पीड, २६ ओटीटी ॲप्स आणि ३५० लाइव्ह टीव्ही चॅनेलची सुविधादेखील दिली जाते.
१,०९९ रुपयांचा प्लॅन – या प्लॅनसह युजर्सना २०० एमबीपीएस इंटरनेट स्पीडचा फायदा, त्यात २८ ओटीटी ॲप्स व ३५० लाइव्ह टीव्ही चॅनेल्स, तसेच दोन अॅड-ऑन ॲप्स म्हणजेच अॅपल टीव्ही प्लस आणि अमेझॉन प्राइमचासुद्धा समावेश असणार आहे.
१,५९९ रुपयांचा प्लॅन – या ऑफरमध्ये, युजर्स ३०० एमबीपीएसच्या इंटरनेट स्पीडचा आनंद घेऊ शकतात. तसेच २९ ओटीटी ॲप्स आणि ३५० लाईव्ह टीव्ही चॅनेलचा वापर करू शकतात. या प्लॅनमध्ये तीन अतिरिक्त ॲप्स देखील समाविष्ट आहेत जसे की, अॅपल टीव्ही+, नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम.
३,९९९ रुपयांचा प्लॅन – हा प्रीमियम प्लॅन युजर्सना १ Gbps चा प्रभावी इंटरनेट स्पीड देतो. त्याचबरोबर ग्राहकांना २९ ओटीटी ॲप्स आणि ३५० लाइव्ह टीव्ही चॅनेल्स, तसेच तीन अतिरिक्त ॲप्लिकेशन्सचा ॲक्सेस मिळतो, ज्यामध्ये अॅपल टीव्ही+, नेटफ्लिक्स व अमेझॉन प्राइमचा समावेश असणार आहे.