Rilance Jio- Airtel-VI: रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या देशातील मोठया दूरसंचार कंपन्या आहेत. या कंपन्या आपल्या युजर्ससाठी नवनवीन प्लॅन्स आणत असतात. जर तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल डेटावर खूप खर्च करावा लागत असेल. मात्र तुम्ही आंतरराष्ट्रीय रोमिंग स्कीमचा विचार करू शकता. Airtel, Reliance Jio , Idea -Vodafone या कंपन्यांनी आपल्या युजर्ससाठी काही पोस्टपेड प्लॅन आणले आहेत ज्यामुळे आंतरराष्ट्रीय कॉल्समध्ये भरपूर पैसे वाचवू शकतात. ते प्लॅन कोणते आहेत ते आपण पाहुयात.
Vodafone Idea आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड योजना
वोडाफोन आयडिया कसे काही चांगले आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड प्लॅन आहेत . ज्यात युजर्सना अनलिमिटेड कॉल्स आणि मोबाईल डेटा देतात. या प्लॅनमध्ये २८ दिवसांची मुदत असून २४ तास ते वापरता येते. हाँगकाँग, इटली, स्पेन, न्यूझीलंड, इंडोनेशिया, यूएस आणि यूकेयांसारख्या ८० देशांमध्ये हे प्लॅन लागू पडतात. यामध्ये सर्वात स्वस्त प्लॅन आहे ५९९ रुपयांचा आहे. अनलिमिटेड कॉल्स , फ्री इनकमिंग कॉल्स , अनलिमिटेड एसएमएस असे फायदे या प्लॅनमध्ये मिळतात.
त्यापेक्षा विस्तारित प्लॅन तुम्ही शोधात असाल तर तो २,९९९ रुपयांचा आहे. ज्याची वैधता ७ दिवसांची आहे. वरीलप्रमाणेच सर्व फायदे या प्लॅनमध्ये मिळतात. तसेच यामध्ये ३,९९९ रुपये आणि ४,४९९ रुपयांचा प्लॅन येतो. ज्याची वैधता अनुक्रमे १० व १४ दिवसांसाठी असते. ज्यात अनलिमिटेड डेटा , मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्स करता येतात.
वोडाफोन आयडियाची सर्वात आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड महाग प्लॅन हा ५,९९९ रुपये इतका आहे. त्याची वैधता २८ दिवसांची आहे. १५ जीबी मोबाईल डेटा , १५०० मिनिटे आउटगोइंग कॉल व देशांतर्गत कॉल , मोफत एसएमएस करता येतात.
हेही वाचा : Amazon Republic Day Sale: Alexa स्पीकरपासून किंडलपर्यंत मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या
Reliance Jio आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड योजना
रिलायन्स जिओकडे फक्त दोनच आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड स्कीम आहेत. ज्या १७० देशांमध्ये वापरता येतात. दोन्ही प्लॅनची किंमत ही सारखीच आहे. त्यात एक फरक आहे तो म्हणजे एक प्लॅन वायफाय कॉलिंगला परवानगी देतो व एक देत नाही. हा प्लॅन १,१०१ रुपयांचा आहे त्यामध्ये रोमिंग वापरासाठी ९३३. ०५ रुपये वापरण्यास मिळतात. वायफाय वर इनकमिंग कॉल्स १ रुपयांमध्ये जगाच्या कोणत्याही ठिकाणहून केले जाऊ शकतात.
दुसरा प्लॅन आहे तो १,१०२ रुपयांचा. ज्याची वैधता २८ दिवस इतकी आहे. यामध्ये ९३३.९० रुपये वापरण्यास मिळतात. वरीलप्रमाणेच तुम्हाला पाच आयएसडी एसएमएस मिळतात. तुम्ही जिओ नंबर असले तर वायफायद्वारे व्हिडीओ कॉलिंग करू शकता.
हेही वाचा : Amazon Republic Day Sale: ‘या’ उपकरणांवर मिळतेय ‘इतकी’ सूट; जाणून घ्या
Airtel आंतरराष्ट्रीय रोमिंग पोस्टपेड योजना
एअरटेलने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जागतिक प्लॅन सुरु केले. १८४ देशांमध्ये हे प्लॅन उपलब्ध आहेत. एअरटेलच्या सर्वात स्वस्त आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅनची किंमत हि ६४९ रुपये आहे. त्याची वैधता फक्त एक दिवस इतकीच आहे. हे भारतातील स्थानिक नंबरवर १०० मिनिटांचे व्हॉइस कॉल करण्याची ऑफर देते. यात ५०० एमबी हाय स्पीड डेटा मिळतो.
ज्यांना जास्त दिवसांच्या वैधतेचा प्लॅन हवा आहे त्यांनी २,९९९ रूपांचा प्लॅन घेण्याचा विचार करावा. ज्यात ५जीबी हाय स्पीड डेटा आणि भारतात १०० मिनिटांचे व्हॉइस कॉल्स व इंटरनेट वापरायला मिळते. तसेच एअरटेलचा ३,९९९ रुपयांचा प्लॅन आहे. ज्याची वैधता ३० दिवसांची असणार आहे. वरीलप्रमाणेच सगळे फायदे युजर्सना मिळतात. फक्त हाय स्पीड डेटा १२ जीबी इतका डेटा वापरायला मिळतो.
तुम्ही काही महिन्यांसाठी परदेशी जाणार असाल तर तुम्ही एअरटेलच्या ५,९९९ चा प्लानचा विचार करायला हवा. ज्याची वैधता ९० दिवस इतकी आहे. २ जीबी डेटा आणि ९०० मिनिटांचा व्हॉइस कॉल करता येतो.
जे पूर्ण वर्षाच्या रोमिंग प्लॅनची अपेक्षा करत आहेत त्यांच्यासाठी १४,९९९ रुपयांचा प्लॅन आहे. ज्यात १५ जीबी हाय स्पीड डेटा आणि ३००० मिनिटांचे व्हॉइस कॉल असे फायदे मिळतात.