आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. तसेच भारतीय लोकं मोठ्या प्रमाणात प्रीपेड कनेक्शनचा वापर करतात. मात्र पोस्टपेड कनेक्शनचे देखील अनेक फायदे आहेत. यामध्ये वापरकर्ते रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडफोन आयडिया या प्रमुख कंपन्यांचे सिमकार्डचा वापर करतात. प्रीपेड रीचार्ज प्रमाणे पोस्टपेड प्लॅन्समध्ये एकसारखे रीचार्ज करावे लागत नाही. जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. मात्र अजून वोडफोन आयडिया कंपनीला ५ जी नेटवर्क सुरू करता आलेले नाही.

तुम्ही तुमचे प्रीपेड कनेक्शन पोस्टपेड कनेक्शनमध्ये ट्रान्सफर करू शकता. त्यासाठी अनेक सोपे पर्याय उपलब्ध आहेत. भारतामध्ये तुम्ही तुमचे प्रीपेड कनेक्शन पोस्टपेडमध्ये कसे बदलू शकता याबद्दलच्या काही सोप्या स्टेप्स आपण जाणून घेणार आहोत.

Jio Launched affordable recharge Plan
Jio Affordable Plan : जिओने गुपचूप लाँच केला स्वस्त रिचार्ज प्लॅन! फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये महिनाभर वापरता येईल इंटरनेट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
TRAI intervention: Jio, Airtel, Vi launch revised voice-only recharge plans
युजर्ससाठी आनंदाची बातमी; महागड्या रिचार्जपासून दिलासा! TRAI च्या कारवाईनंतर Jio-Airtel-VI-BSNL ने कमी केल्या किंमती
Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये
How To Access DeepSeek On Web
ChatGPT आणि Gemini ला देणार टक्कर! DeepSeek चा नक्की कसा करायचा वापर?
Without internet recharge plans Airtel Jio Vi launches voice and sms only recharge plans cheapest prepaid recharge plans
घरात वायफाय असणाऱ्यांसाठी Airtel-Jio-Vi चा जबरदस्त प्लॅन! दिवसाला फक्त ५ रुपये खर्च, जाणून घ्या किंमत किती
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
Cyber ​​Lab Pune, cyber crimes, investigating cyber crimes, Cyber ​​Lab, pune, loksatta news,
नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’, सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक यंत्रणा

हेही वाचा : Flipkart Big Saving Days sale: ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट स्मार्टफोन

अधिकृत स्टोअरला भेट द्यावी

तुम्ही तुमचे प्रीपेड कनेक्शन पोस्टपेडमध्ये ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्या त्या टेलिकॉम कंपनीच्या अधिकृत स्टोअरमध्ये जाऊन ट्रान्सफर करून घेणे. तुमच्याकडे जिओचे सिमकार्ड असल्यास तुम्ही प्रीपेडचे पोस्टपेड करण्यासाठी जिओ स्टोअर किंवा रिलायन्स डिजिटल स्टोअरला भेट देऊ शकता. त्याचप्रमाणे Vi व Airtel चे सिमकार्ड असल्यास त्या त्या कंपनीच्या स्टोअरमध्ये जावे. महत्वाची बाब म्हणजे प्रीपेड सिमकार्ड खरेदी करताना तुम्हाला फक्त आधार कार्डचीच आवश्यकता लागते. मात्र पोस्टपेड सिमकार्डसाठी eKYC सह अतिरिक्त कागदपत्रांची गरज भासू शकते.

जिओ प्रीपेडचे पोस्टपेडमध्ये कसे ट्रान्सफर करावे ?

जर का तुम्हाला जिओचे सिमकार्ड पोस्टपेडमध्ये ट्रान्सफर करायचे असेल तर त्यासाठी खूप सोपी प्रक्रिया आहे. जिओ पोस्टपेड सेवेला जिओप्लस म्हटले जाते. तुम्ही जिओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा My jio App वॉर जाऊन सुद्धा ट्रान्सफर करू शकता. App मध्ये गेल्यावर ज्या प्लॅनमध्ये तुम्हाला सबस्क्राईब करायचे त्यावर क्लिक करा आणि त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर समाविष्ट करा. त्यानंतर तुम्हाला आलेला ओटीपी समाविष्ट करावा. त्यानंतर तुमचे जिओ प्रीपेड प्लॅन हा जिओप्लस पोस्टपेड प्लॅनमध्ये ट्रान्सफर होईल.

हेही वाचा : BSNL युजर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार ‘ही’ सेवा; जाणून घ्या

एअरटेल प्रीपेडचे पोस्टपेडमध्ये कसे ट्रान्सफर करावे ?

एअरटेल प्रीपेडचे पोस्टपेडमध्ये बदलण्यासाठी तुम्ही एअरटेलच्या अधिकृत स्टोअरमध्ये किंवा वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाईटवर जाऊन पोस्टपेडवरून प्रीपेड पर्याय निवडावा . त्यामध्ये जाऊन ओटीपी जनरेट करा. आलेला ओटीपी जनरेत झाला की तो १० मिनिटांसाठी वैध असतो. एअरटेलचे प्रीपेड पोस्टपेडमध्ये ट्रान्सफर होण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी असतो. एअरटेल वापरकर्ते त्यांचे प्रीपेड सिमकार्ड पोस्टपेडमध्ये बदलण्यासाठी एअरटेल थॅंक्स App चा देखील वापरू शकतात.

वोडफोन-आयडियाचे प्रीपेडचे पोस्टपेडमध्ये कसे ट्रान्सफर करावे ?

Vi वापरकर्त्यांना जर का त्यांचे प्रीपेड सिमकार्ड पोस्टपेडमध्ये बदलायचे असल्यास तुम्ही वेबसाइट आणि स्टोअरमध्ये जाऊन करू शकता. vi App वर जाऊन प्रीपेड टु पोस्टपेड पर्याय निवडावा. त्यानंतर तुम्हाला आलेला ओटीपी Add करा आणि प्रीपेड सिमचे रूपांतर पोस्टपेडमध्ये करून घ्या.

Story img Loader