Rilance Jio- Airtel-VI: रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या देशातील मोठया दूरसंचार कंपन्या आहेत. या कंपन्या आपल्या युजर्ससाठी नवनवीन प्लॅन्स आणत असतात. रिलायन्स जिओ , एअरटेल या कंपन्यानी आपले ५ जी नेटवर्क देशातील अनेक शहरांमध्ये सुरू केले आहे. अधिकाधिक वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी आणि सध्या असलेल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी भारतातील प्रसिद्ध दूरसंचार कंपन्या एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया यांनी अलीकडेच नवीन मोबाइल रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत.
या कंपन्यानी आणलेले या रीचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला खूप फायदे मिळणार आहेत. हे प्लॅन्स डेटा, कॉलिंग आणि अन्य फायदे ऑफर करतात. जर का तुम्ही दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात डेटा वापरत असाल आणि अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा वापरत असाल तर हे प्लॅन्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात.
Airtel चा फॅमिली पोस्टपेड प्लॅन
एअरटेलने आपला ५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये एअरटेल तुम्हाला ७५ जीबी प्लस ३० जीबी डेटा ऑफर करते. प्लॅनमध्ये २०० जीबी पर्यंत डेटा रोलओव्हर करण्याची सुविधा आहे. तसेच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस शिवाय या प्लॅनमध्ये ६ महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप आणि एक वर्षासाठी मोफत Disney+Hotstar मोबाइल सेवा देखील मिळते.
Jio चा क्रिकेट प्लॅन
जिओच्या २१९ रुपयांचा हा प्लॅन तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ३ जीबी दररोजचा डेटा आणि १४ दिवसांसाठी jio apps मेंबरशिपसह येतो. याशिवाय वापरकर्ते २५ रुपयांचे २ जीबी डेटा ऍड ऑन व्हाउचर मोफत मिळवू शकतात. जे Jio वेलकम 5G ऑफरसाठी पात्र आहेत ते विनामूल्य 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात.
जिओच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड कॉलिंग , दररोज १०० एसएमएस आणि दररोज ३जीबी डेटा वापरायला मिळतो. याशिवाय जिओ वापरकर्ते jio apps विनामूल्य सदस्यता देखील घेऊ शकतात. तसेच ६१ रुपयांचा ६ जीबी डेटा ऍड ऑन व्हाउचर मोफत मिळवू शकतात.
हेही वाचा : परदेशात जाताय? जाणून घ्या Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ रोमिंग पोस्टपेड प्लॅन्स
जिओच्या ९९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग , दररोज १०० एसएमएस आणि ८४ दिवसांसाठी दररोजचा ३ जीबी डेटा वापरायला मिळतो. jio apps चा आनंद वापरकर्ते या प्लॅनमध्ये घेऊ शकतात. तसेच २४१ रुपयांमध्ये ४० जीबी अतिरिक्त डेटा मोफत मिळवू शकतात.
Vodafone Idea चा प्रीपेड प्लॅन
VI चा २८९ रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये ४ जीबी देता ४८ दिवसांसाठी मिळतो. ज्याची प्रतिदिन मर्यादा नाही. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह एकूण ६०० एसएमएस करता येणार आहेत.
VI चा दुसरा प्रीपेड प्लॅन हा ७८ दिवसांच्या वैधतेमध्ये येतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि १००० एसएमएससह येतो. वापरकर्त्यांना कॉलिंग आणि एसएमएसच्या फायद्यांशिवाय दररोजच्या मर्यादेशिवाय ६ जीबी डेटा देखील मिळेल.