स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या कॉलिंग या पर्यायामुळे एखादी आनंदाची बातमी लगेच इतरांना कळवणे, संकटाच्या काळात इतरांना फोन करून लगेच बोलावून घेणे, दूरच्या नातेवाईकांबरोबर सहज संवाद साधणे आदी अनेक गोष्टी आपण सहज करू शकतो. अनेकदा काही महत्वाच्या किंवा वैयक्तिक कामासाठी आपल्या सगळ्यांनाच कॉल हिस्टरीची मदत लागते. तुम्ही एक महिन्याची कॉल हिस्टरी तुमच्या फोनमध्ये सहज बघू शकता. पण, हेच जर तुम्हाला दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त आधीच्या कॉल हिस्टरी हव्या असतील तर ते शोधणं आपल्या सगळ्यांसाठीच थोडं कठीण जाते. तर सहा महिन्यांपर्यंत कॉल हिस्टरी जाणून घेण्यासाठी काही स्टेप्स पाहू. एअरटेल आणि जीओ वापरकर्ते खालीलप्रमाणे त्यांच्या कॉल हिस्टरी पाहू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१. एअरटेल वापरकर्ते दोन पद्धतीत त्यांच्या कॉल हिस्टरी तपासू शकतात. पहिलं म्हणजे एसएमएस आणि दुसरं म्हणजे वेबसाईट.

एसएमएस:

तुमच्या मोबाईलमध्ये एअरटेल मेसेज ॲप असेल तर तो उघडा आणि रिसीव्हर म्हणून “१२१” नंबर तिथे लिहा.
संदेश म्हणून “EPREBILL” टाइप करा.
तुम्हाला हव्या असणाऱ्या कॉलचा कालावधी किंवा विशिष्ट तारीख तिथे लिहा.
कॉल हिस्टरी मिळवण्यासाठी तिथे तुमचा ईमेल आयडी लिहा.
तुमच्या एअरटेल नंबरवरून मेसेज पाठवा. तुम्हाला कॉल हिस्टरी सहज मिळेल.

एअरटेल वेबसाईट :

वापरकर्त्यांना एअरटेल ग्राहक सेवेकडून कॉल रेकॉर्डिंग मिळवणेदेखील सोपे जाईल. एअरटेल कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधून किंवा एअरटेल स्टोअरला वैयक्तिकरित्या भेट देऊन हे केले जाऊ शकते. तसेच या सगळ्यासाठी शुल्कसुद्धा आकारले जाऊ शकते आणि तुम्हाला खाते पडताळणीसाठी ओळखदेखील प्रदान करण्याची गरज भासू शकते; हे ग्राहकांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

तर तुमच्या मोबाइलमध्ये एअरटेल वेबसाइटला भेट द्या आणि तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा.
‘Usage Details’ विभागात नेव्हिगेट करा.
‘Usage Details’ अंतर्गत विशिष्ट कालावधीसाठी कॉल रेकॉर्ड पाहण्याचा पर्याय शोधा.
तारीख निवडा आणि ‘सबमिट’वर क्लिक करा.
तुमचे कॉल रेकॉर्ड स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील.

हेही वाचा…नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जिओने ग्राहकांसाठी लाँच केला ‘हा’ हटके प्लॅन; जाणून घ्या…

२. जिओ युजर्स कशाप्रकारे कॉल हिस्टरी चेक करू शकतात ते पाहू :

तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोअरवरून माय जिओ ॲप इन्स्टॉल करा. (My Jio App)
तुमच्या जिओ नंबरवरून लॉग इन करा.
ॲपवर तुमचा नंबर लिंक करा आणि माय स्टेटमेंट हे सेक्शन Access करा.
त्यानंतर डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डाव्या ओळींवर क्लिक करा.
नंतर “माय स्टेटमेंट” पर्यायावर टॅप करा.
तुम्हाला ज्या तारखेची कॉल रेकॉर्डिंग पाहायची आहे ती तारीख तिथे लिहा.
त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर पाहा हा पर्याय येईल, त्यावर टॅप करा आणि तुमच्या समोर कॉल रेकॉर्ड येतील.