तुम्ही वापरत असलेल्या नेटवर्कचा दैनंदिन मर्यादित डेटा प्लान संपला की अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता असेल, तेव्हा बूस्टर डेटा प्लान उपयुक्त ठरू शकतो. कमी खर्चात तातडीची गरज भागवता येते. तुम्हाला Jio, Airtel आणि Vodafone Idea वर मिळू शकणार्या सर्वात स्वस्त आणि सर्वात जास्त डेटा प्लान येथे आहेत. यापैकी बहुतेक प्लान तुमच्या सध्याच्या योजनेच्या वैधतेवर कालबाह्य होतील. दुसरीकडे, जर तुमच्या प्लानची वैधता थोड्या काळासाठी असेल, तर तुम्ही जास्त रकमेसह डेटा बूस्टर घेऊ नका. तुमच्यासाठी कोणता डेटा बूस्टर चांगला आहे ते येथे जाणून घ्या.
Airtel डेटा बूस्टर प्लान :
एअरटेलचा ५८ रुपयांचा डेटा बूस्टर प्लान आहे, जो ३ जीबी डेटा देतो. ९८ रुपयांचा ५ जीबी डेटा प्लान देखील आहे. यामध्ये वापरकर्त्यांना Wynk Music Premium चे सबस्क्रिप्शन देखील मिळते. यापेक्षा अधिक डेटा हवा असल्यास Airtel चा एक ६ जीबी डेटा बूस्टर प्लान देखील आहे. १०८ रुपयांच्या प्लानमध्ये विनामूल्य Hello Tunes आणि इतर फायदे मिळतात. त्याचबरोबर ११८ रुपयांत १२ जीबी आमि १४८ रुपयांत १५ जीबी डेटा बूस्टर प्लान आहे. तर ३०१ रुपयांच्या प्लानमध्ये ५० जीबीचा अतिरिक्त डेटा मिळतो.
Vi डेटा बूस्टर प्लान :
व्होडाफोन आयडिया कंपनीकडेही आकर्षक डेटा बूस्टर प्लान आहेत. मात्र हे डेटा बूस्टर प्लान वैधतेसह येतात. १९ रुपयांच्या प्लानमध्ये १ जीबी डेटा मिळतो. या प्लानचा अवधी २४ तासांचा आहे. तर ४८ रुपयांच्या प्लानमध्ये २१ दिवसांसाठी २ जीबी डेटा मिळतो. या व्यतिरिक्त ५८ रुपयांचा प्लान २८ दिवसांसाठी येतो आणि ३ जीबी डेटा मिळतो. ९८ रुपयांच्या प्लानमध्ये २१ दिवसांसाठी ९ जीबी डेटा मिळतो. ११८ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी १२ जीबी, २९८ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी ५० जीबी आणि ४८ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी १०० जीबी डेटा मिळतो.
गुगल लोकप्रिय Gmail चं रुपडं पालटणार, काय बदल होणार जाणून घ्या
Jio डेटा बूस्टर प्लान:
जिओचे चार बूस्टर प्लान आहेत.१५ रुपयांचा प्लानमध्ये १ जीबी डेटा मिळतो. २५ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी, ६१ रुपये आणि १२१ रुपयांच्या प्लानमध्ये १२ जीबी डेटा मिळतो. यासह जिओचे वर्क फ्रॉम होमसाठी विशेष प्लान आहेत. हे प्लान वैधतेसह येतात. १८१ रुपयांच्या प्लानमध्ये ३० जीबी डेटा, २४१ रुपयांच्या प्लानमध्ये ४० जीबी डेटा आणि ३०१ रुपयांच्या प्लानमध्ये ५० जीबी डेटा ३० दिवसांसाठी मिळतो. या व्यतिरिक्त २९६ रुपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांसाठी २५ जीबी डेटा मिळतो.