est Postpaid Plans for Airtel, Jio, VI with OTT Benefits: गेल्या काही वर्षांत दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा झपाट्याने वाढली आहे. यामुळेच रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) सारख्या मोठ्या दूरसंचार कंपन्यांनी परवडणाऱ्या प्लॅन्समध्ये उत्तम सुविधा दिल्या आहेत. OTT प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, जिओ , एअरटेल आणि वोडाफोन आयडिया (Vi) देखील अनलिमिटेड कॉल्स आणि मोबाइल डेटा ऑफर करतात. जिओकडे सध्या ओटीटी ऑफरसह कोणताही प्रीपेड प्लॅन नाही. पण वोडाफोन आयडिया आणि एअरटेलकडे अजूनही प्रीपेड योजना आहेत ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश देतात. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन-आयडियाचे सर्वात लोकप्रिय प्लॅन जाणून घेऊयात.

Relaince Jio पोस्टपेड स्कीम (OTT)

रिलायन्स जिओचे पाच पोस्टपेड प्लॅन्स आहेत ज्यात Amazon Prime आणि Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्म वापरता येतात. जिओकडील सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत ही ३९९ रुपये इतकी आहे. त्यात अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएस आणि एका महिन्यासाठी ७५ जीबी डेटा तसेच २०० जीबी डेटा रोलओव्हर यांसारखे फायदे मिळतात. यातच तुम्हाला एका वर्षाचे Netflix मोबाईल आणि एक वर्षाचे Amazon प्राइमचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
Champions Trophy Cricket Tournament BCCI demand to organize matches in Dubai sport news
पाकिस्तानात खेळण्यास नकारच! दुबईत सामने आयोजित करण्याची ‘बीसीसीआय’ची मागणी
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
Jet Airways re flight possibilities end Supreme Court orders liquidation of company
जेट एअरवेजच्या फेर-उड्डाणाची शक्यता संपुष्टात; सर्वोच्च न्यायालयाचा कंपनी अवसायानांत काढण्याचे आदेश
Jet Airways Air Service Industry Employment of employees
जेट एअरवेज: उदय-अस्ताचा ३२ वर्षांचा प्रवास
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

तुम्ही अतिरिक्त खर्च करू शकत असल्यास ५९९ रुपयांचा प्लॅन देखील जीओकडे आहे. यामध्ये १०० जीबी डेटा आणि २००जीबी डेटा रोलओव्हर आणि बाकी वरीलप्रमाणेच सर्व फायदे मिळतात.

७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १५० जीबी डेटा २००जीबी डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड कॉल्स , दररोज १०० एसएमएस आणि फॅमिली प्लॅन्ससाठी दोन २ अतिरिक्त सिम कार्ड मिळतात.

जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २००जीबी डेटा ५००जीबी डेटा रोलओव्हर आणि बाकी ३९९ च्या प्लानप्रमाणेच फायदे मिळतात.जिओकडील सर्व पोस्टपेड योजना वापरकर्त्यांना JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सच्या मानक सूटमध्ये प्रवेश देतात.

रिलायन्स जिओच्या सर्वात महागड्या प्लॅनची किंमत १४९९ रुपये इतकी आहे. यात ३०० जीबी मोबाईल डेटा आणि ५०० जीबी डेटा रोलओव्हर येतो. अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएस मिळतात. यासह तुम्हाला ५ जीबी इंटरनेट आणि ५०० मिनिटे आंतरराष्ट्रीय, स्थानिक आणि USA मधून भारतात कॉल्स करण्यास मिळतात. तसेच एक वर्षाचे Amazon प्राइम मेंबरशिप आणि मोफत Netflix मोबाइल सबस्क्रिप्शन मिळते.

हेही वाचा : Amazon Sale 2023: अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट, जाणून घ्या कधीपासून होणार सुरुवात

Airtel पोस्टपेड स्कीम (OTT)

भारती एअरटेलचे चार पोस्टपेड प्लॅन आहेत. ज्यामध्ये वापरकर्त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्म वापरण्याचा फायदा मिळतो. ४९९ रुपयांच्या पहिल्या प्लॅनमध्ये महिन्यभरासाठी ७५ जीबी डेटा,२००जीबी डेटा रॉलओव्हर, अनलिमिटेड कॉल्स आणि हँडसेट प्रोटेक्शन व Wynk प्रीमियम असे फायदे मिळतात. यात ओटीटीमध्ये सहा महिने Amazon Primeची मेंबरशिप आणि मोबाईलसाठी डिझनी प्लस हॉटस्टार एक वर्षासाठी वापरण्यास मिळते.

तुम्ही २९९ रुपये अतिरिक्त भरल्यास तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएसची सुविधा आणि ३० जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. तसेच एक फॅमिली कनेक्शन मिळेल जे एकूण डेटामध्ये जोडले जाईल. ओटीटीमध्ये एक वर्ष डिझनी हॉटस्टार मोबाईलसाठी, एका महिन्यासाठी नेटफ्लिक्क्स , कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहा महिने Amazon प्राइमची मेंबरशिप मिळते.

एअरटेलचा सर्वात महागडा प्लॅन आहे १४९९ रुपयांचा आहे. यामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी चार मोफत ऍड ऑन व्हाईस कनेक्शन ऑफर करतो. याशिवाय अनलिमिटेड कॉल्स , १०० एसएमएस दररोज, महिन्याभराचा २००जीबी डेटा व २०० जीबी डेटा रोलओव्हर आणि Wynk प्रीमियमचा अ‍ॅक्सेस मिळतो. यात अजून एका वर्षासाठी डिझनी प्लस हॉटस्टार, सहा महिन्यांसाठी Amazon Prime आणि नेटफ्लिक्क्सचे सदस्यत्व मिळते.

हेही वाचा : २०० दशलक्ष लोकांचा डेटा चोरी झाल्याचा दावा Twitterने फेटाळला

Vodafone-Idea पोस्टपेड स्कीम (OTT)

एअरटेलप्रमाणेच वोडाफोन-आयडियाचे सुद्धा चार पोस्टपेड प्लॅन्स आहेत. ज्यात वापरकर्त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्म वापरण्याचे फायदे मिळतात. यामध्ये सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत ४१० रुपये असून, यात दरमहा ५० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स ऑफर करतो. अतिरिक्त फायद्यांमध्ये एक वर्षाचे SonyLiv मोबाइल सबस्क्रिप्शन, Zee5 प्रीमियम चित्रपट, Vi Movies आणि Vi अॅपमध्ये हंगामा म्युझिकचा सहा महिन्यांचा जाहिरातमुक्त प्रवेश यांचा समावेश आहे.

तुम्हाला धिक मोबाईल डेटा हवा असल्यास ५०१ रुपयांच्या प्लानचा देखील तुम्ही विचार करू शकता. एका महिन्यासाठी ९० जीबी डेटा, सहा महिन्यांसाठी अ‍ॅमेझोन प्राईमचे सब्स्क्रिप्शन , एक वर्ष डिझनी प्लस हॉटस्टार मोबाईलचे सब्स्क्रिप्शन , सहा महिने Vi अॅपमध्ये जाहिरातमुक्त हंगामा म्युझिक आणि Zee5 प्रीमियम असे फायदे मिळतात.

७०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये अँलिमिटेड कॉल्स , अनलिमिटेड मोबाईल डेटा यासारखे फायदे मिळतात. एक वर्ष डिझनी प्लस हॉटस्टार मोबाईल व टीव्हीचे सब्स्क्रिप्शन , सहा महिने Vi अॅपमध्ये जाहिरातमुक्त हंगामा म्युझिक आणि Zee5 प्रीमियम असे फायदे मिळतात.

वोडाफोनकडे REDX पोस्टपेड प्लॅन देखील आहे, ज्याची किंमत तुम्हाला प्रत्येक महिन्याला रु. १,१०१ रुपये असेल. यात अनलिमिटेड कॉल्स आणि डेटा आणि प्रतिमहिना ३००० एसएमएस मिळतात. यात सात दिवसांचा आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक , आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये दरवर्षी चार वेळा प्रवेश मिळणार. बुकिंग आणि फ्लाईट्सवर २००० पर्यंत सूट आणि हॉटेल्सवर ५०० रुपयांची सूट मिळते.

हेही वाचा : OpenAI आणणार ChatGPT चे पेड व्हर्जन; नसणार ब्लॅकआऊट विंडो

कोणत्या पोस्टपेड योजनेची निवड करावी?

जर तुम्ही पोस्टपेड मोबाईल प्लॅन शोधत असाल जो एक कनेक्शन ऑफर करतो. तर रिलायन्स जिओ कडून रु. ५९९ सर्वात अर्थपूर्ण आहे. हे दरमहा १००जीबी डेटा, एक वर्ष Amazon प्राइम मेंबरशिप आणि मोफत Netflix Mobile ऑफर करते.

तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी प्लॅन शोधात असाल तर, एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्लॅन तुम्ही घेऊ शकता. यात तीन कनेक्शन येतात. अनलिमिटेड कॉल्स, महिन्याला १५० जीबी डेटा मिळतो. डिझनी प्लस हॉटस्टार मोबाईलवर एका वर्षासाठी , सहा महिने अॅमेझॉन प्राइमची मेंबरशिप मिळते.

जे वारंवार प्रवास करतात त्यांनी वोडाफोन आयडियाचा १,१०१ रुपयांचा प्लॅन निवडावा. ज्यामध्ये सात दिवसांचा आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक, चार विनामूल्य आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंज प्रवेश, Zee5 वर प्रीमियम सामग्री, Amazon Prime ची मेंबरशिप , Disney+ Hotstar मेंबरशिप आणि एक वर्षाची SonyLiv प्रीमियम मेंबरशिप मिळते.