भारतात कालपासून आयसीसी पुरुष वर्ल्ड कप स्पर्धा २०२३ सुरू झाली आहे. काल इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघात वर्ल्डकपच्या पहिला सामना पार पडला. यामध्ये न्यूझीलंडचा संघ विजयी झाला. भारतात वर्ल्ड कप असल्याने येथील सर्वच क्रिकेटचे चाहते खूप उत्साहात आहेत. काहीजण स्टेडियमवर जाऊन तर काहीजण मोबाइल, लॅपटॉप, टीव्हीवर सामन्यांचा आनंद घेत आहेत. मात्र आता चाहत्यांचा आनंद अधिक वाढणार आहे कारण, एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी वर्ल्ड कप साठी स्पेशल प्रीपेड रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.
भारतात आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी पुरुष वर्ल्ड कप स्पर्धेत १० संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक जण या सामन्याचा आनंद नेटवर्कच्या कोणत्याही अडचणींशिवाय घेऊ इच्छित आहे. त्यासाठी एअरटेलने दोन स्पेशल प्लॅन लॉन्च केले आहेत. क्रिकेटचा प्रत्येक चाहता सामना बघण्यापासून दूर राहू नये यासाठी ४९ रुपये आणि ९९ रुपयांचा स्पेशल किर्केट प्लॅन्स घेऊन आले आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
एअरटेलचे स्पेशल क्रिकेट प्लॅन्स
एअरटेलने खास करून क्रिकेट प्रेमींसाठी तयार करण्यात आलेल्या दोन लॉन्चिंग लॉन्चिंग केले आहे. हे प्लॅन अशा लोकांसाठी उपयुक्त आहेत जे वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक क्षण बघण्यासाठी उत्सुक आहेत. हे प्लॅन केवळ प्रीपेड ग्राहकांसाठीच उपलब्ध असणार आहेत.
४९ रूपयांचा एअरटेलचा प्लॅन: जे वापरकर्ते लहान किमतीच्या प्लानचा विचार करत असाल तर एअरटेलने ४९ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. जो क्रिकेट स्पेशल प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ६ जीबी डेटा वापरायला मिळतो. यामध्ये एक दिवसाची वैधता मिळते.
९९ रूपयांचा एअरटेलचा प्लॅन: एअरटेलने २ दिवसांच्या वैधतेसह ९९ रुपयांचा स्पेशल क्रिकेट प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामुळे वापरकर्ते कोणत्याही अडचणीशिवाय सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. यात अनलिमिटेड डेटा मिळतो.
हेही वाचा : मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ शहरात WhatsApp च्या मदतीने खरेदी करता येणार तिकीट
मोबाइल प्रीपेड प्लॅनशिवाय क्रिकेट चाहत्यांसाठी खास रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्यासाठी एअरटेल DTH स्टार नेटवर्कसाठी बोलणी करत आहे. क्रिकेट रसिकांसांचा सामने बघण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा म्हणून एअरटेल एक्सट्रीम बॉक्सवर एक क्विक अॅक्सेस प्रोमो रेल सादर केले आहे.