भारतामध्ये Airtel ही एक लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेलने आपले ५ जी नेटवर्क देशातील अनेक शहरांमध्ये सुरू केले आहे. तसेच आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनीने मध्यम मुदत असलेले २ आकर्षक रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ते रीचार्ज प्लॅन कोणते आहेत आणि त्यामध्ये कोणते फायदे मिळणार आहेत हे पाहुयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एअरटेल आपल्या ग्राहकांच्या वाढत्या डेटाची मागणी पूर्ण करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करण्यात आघाडीवर आहे. एअरटेल कंपनीने सध्या ५६ आणि ८४ दिवसांच्या वैधतेचे दोन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : Upcoming SmartPhones: आगामी काळामध्ये लॉन्च होणार ‘हे’ टॉप पाच भन्नाट स्मार्टफोन्स, संपूर्ण यादी एकदा पहाच

एअरटेलचा ५४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

५४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा, व्हॉइस आणि एसएमएस यामध्ये काही फायदे मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना व्हिडीओ स्ट्रीमिंग, ब्राऊझिंग आणि बरेच फायदे होणार आहेत. तसेच अनलिमिटेड कॉलिंग देखील करता येणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहक दररोज १०० एसएमएस पाठवू शकतात.

एअरटेलचा ८३९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या ८३९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये २ जीबी दररोजचा डेटा मिळणार आहे. यामुळे वापरकर्ते जास्तीत जास्त इंटरनेटचा फायदा घेऊ शकतील. तसेच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. त्यामुळे वापरकर्ते एखाद्याशी कितीही वेळ संवाद साधू शकणार आहेत. तसेच दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळणार आहे.

८३९ रुपयांच्या प्लॅनचा फायदा म्हणजे यामध्ये वापरकर्त्यांना एअरटेल Xstream Play वर मोफत प्रवेश मिळतो. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने १५ पेक्षा जास्त OTT अॅप्लिकेशन्समधून मनोरंजनाचा कंटेंट वापरकर्ते पाहू शकणार आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel launch 56 and 84 days recharge plan with unlimited calls 2 gb daily deta and check details tmb 01