Airtel ही देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमाकांची टेलिकॉम कंपनी आहे. जिओनंतर एअरटेल कंपनीने देशात आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. भारती एअरटेल या कंपनीने भारतातील पहिले ५जी FWA (फिक्स्ड-वायरलेस एक्सेस) सर्व्हिस लॉन्च केली आहे. या सर्व्हिसला कंपनीने ‘एक्सस्ट्रीम एअरफायबर (Xstream AirFiber) असे नाव दिले आहे. सध्या केवळ दोन शहरांमध्येच ही सर्व्हिस लॉन्च करण्यात आली असून, या दोन्ही शहरातील फीडबॅक घेऊन कंपनी याला सर्वत्र लॉन्च करण्याचे प्लॅनिंग करेल.
घरापर्यंत फायबर एक चांगले वाय-फाय अनुभव प्रदान करतो. ”आज आम्हाला दिल्ली आणि मुंबईतील वापरकर्त्यांसाठी एक्सट्रीम एअरफायबर लॉन्च करताना आनंद होत आहे आणि लवकरच संपूर्ण भारतात लॉन्च करण्याची योजना आहे.” असे भारती एअरटेलने डायरेक्टर ऑफ कन्झ्युमर बिझनेसचे शाश्वत शर्मा म्हणाले.
हेही वाचा : Xiaomi चा धमाका; ‘या’ सिरीजमधील स्मार्टफोनच्या तब्बल ३ लाख युनिट्सची केली विक्री, किंमत…
Airtel Xstream AirFiber पायाभूत सुविधा नसलेल्या क्षेत्रांसाठी उपाय म्हणून काम करते, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये शेवटच्या-माईल कनेक्टिव्हिटीच्या आव्हानाला तोंड देत आहे. हे डिव्हाइस व्यापक इनडोअर कव्हरेज आणि ६४ डिव्हाइसना एकाचवेळी कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय ६ टेक्नॉलॉजीचा वापर करते. याबाबतचे वृत्त indiatvnews ने दिले आहे.
वायरलेस होम वाय-फाय सर्व्हिस ७९९ रुपयांच्या प्लॅन अंतर्गत उपलब्ध आहे. ज्यात वापरकर्त्यांना १०० MBPS चा स्पीड प्राप्त होतो. या प्लानचा फायदा ६ महिन्यांसाठी होतो. ग्राहकांना २,५०० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट द्यावे लागेल जे रिफंडेबल असेल. दिल्ली आणि मुंबईतील ग्राहक Xstream AirFiber सर्व्हिस घेण्यासाठी निवडक एअरटेल स्टोअर्सना भेट देऊन सर्व्हिस सुरू करून घेऊ शकतात.