ऑफिस, शाळा, कॉलेज आदी बऱ्याच कामांसाठी मोबाइल आणि मोबाइलमध्ये पुरेसा नेट असणे गरजेचे असते. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन आदी विविध कंपन्या ग्राहकांसाठी प्रीपेड व पोस्टपेड प्लॅन्स घेऊन येत असतात. काही डेटा प्लॅन्स हे एक महिन्याचे असतात, तर या डेटा प्लॅन्सचा कालावधी समाप्त झाल्यावर पुन्हा हा रिचार्ज आपल्याला रिपीट करावा लागतो. तर तुम्ही एक महिन्याचा रिचार्ज करून कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलने बाकी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत एक दमदार प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. टेलिकॉम कंपनीने वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर हा खास रिचार्ज जोडला आहे. चला तर एअरटेलचा हा नवा प्लॅन कसा असणार आहे पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन प्लॅनमध्ये काय आहे खास ?

भारती एअरटेलने एक नवीन मोबाइल प्रीपेड प्लॅन सादर केला आहे.ओटीटी सबस्क्रिप्शनसह जबरदस्त इंटरनेट शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा सगळ्यात बेस्ट प्लॅन ठरणार आहे. एअरटेलच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत १४९९ रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज ३जीबी (3GB) डेटा आणि १०० एसएमएस दिले जात आहेत. यात अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा असणार आहे. तसेच प्रीपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सच्या सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड ५जी डेटा, अपोलो २४।७ सर्कल (Apollo 24|7 Circle), फ्री हॅलो ट्यून आदी खास गोष्टींचा समावेश असेल. या प्लॅनचा कालावधी ८४ दिवसांचा असेल.

हेही वाचा…इन्स्टाग्राम रील आता सहज करता येईल डाउनलोड; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

हा रिचार्ज तुम्ही कुठे करू शकता ?

तुम्ही एअरटेलचा नवीन प्रीपेड प्लॅन ऑफिशियल वेबसाईट किंवा मोबाइल ॲपवर जाऊन रिचार्ज करू शकता.

नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन असा करा क्लेम :

सगळ्यात पहिल्यांदा प्रीपेड प्लॅनचा रिचार्ज करा. त्यानंतर या रिचार्जवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळवण्यासाठी एअरटेल थँक्स ॲपमध्ये ( Airtel Thanks app) जा. नंतर डिस्कव्हर थँक्स बेनेफिट्स (Discover Thanks Benefits) पेजवर जाऊन प्रोसिड (Proceed) बटणावर क्लिक करा. आता तुमच्या रिचार्जमध्ये म्हणजेच प्रीपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन ॲक्टिव्हेट (activate) होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel launched a powerful prepaid plan content on ott platforms can be watched and 3 gb data will be available asp
Show comments