Airtel Long Validity Plans List : जिओ, एअरटेल, व्हीआय यांची देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांमध्ये गणना होते. त्यांच्यापैकी एअरटेल ही कंपनी विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन सादर करते. या रिचार्ज प्लॅनमध्ये अगदी एक दिवस, एक महिना ते एक वर्षापर्यंतच्या प्लॅनचाही समावेश असतो. पण, तुम्हाला सतत रिचार्ज करण्याचा कंटाळा येत असेल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या तीन स्टॅण्डआउट रिचार्ज प्लॅन्सबद्दलची माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वर्षभर रिचार्ज करण्याचे टेन्शन राहणार नाही (Airtel Long Validity Plans).
१. १९९९ रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा १९९९ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना ३६५ दिवसांची वैधता देते, ज्यामुळे तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच पेमेंट करावे लागेल (Airtel Long Validity Plans) . हा प्लॅन तुम्हाला महिन्याला केवळ १६७ रुपयांना पडेल. हा प्लॅन केल्यानंतर तुम्ही वर्षभर सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, २४ जीबी डेटासह म्हणजेच तुम्ही दरमहा २ जीबीपर्यंत हाय-स्पीड डेटा वापरू शकता. याव्यतिरिक्त प्लॅनमध्ये दररोज १०० मोफत एसएमएससुद्धा दिले जातील. त्याचप्रमाणे हा प्लॅन Airtel Xstream, हॅलो ट्युनमध्ये विनामूल्य प्रवेश करण्याची संधी देईल.
२. ३,५९९ रुपयांचा प्लॅन
तुम्हाला वर्षातून एकदाच रिचार्ज करण्याचा प्लॅन निवडायचा असेल, तर एअरटेलचा ३,५९९ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. ३६५ दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग, २ जीबी डेटा, दररोज १०० फ्री एसएमएस ही प्लॅनची वैशिष्ट्ये आहेत. या रिचार्जची मासिक किंमत अंदाजे ३०० रुपये आहे.
२. ३,९९९ रुपयांचा प्लॅन
वर्षभराचा रिचार्ज, अतिरिक्त डेटा आणि मनोरंजनसुद्धा पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच पेमेंट करावे लागेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, दैनंदिन २.५ जीबी डेटा, ग्राहकांना बक्षीस म्हणून ५ जीबी अतिरिक्त डेटाचा बोनस मिळेल. या प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईलचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शनसुद्धा दिले जाईल.