Airtel ही भारतातील एक टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीने देशातील अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नटवर्क सुरु केले आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांच्या डेटाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. अनलिमिटेड ५जी डेटा ते मोफत OTT सबस्क्रिप्शनपर्यंत एअरटेलकडे विविध रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. एअरटेल देखील सध्या Disney+ Hotstar आणि Amazon Prime सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. जेणेकरून एअरटेलचे ग्राहक अनलिमिटेड इंटरनेटच्या मदतीने आपल्या आवडत्या कंटेंटचा मनमुराद आनंद घेऊ शकतात.

जर का तुम्ही OTT च्या फायद्यांसह काही प्रीपेड मोबाइल रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर, Airtel कडे डिस्नी + हॉटस्टार आणि इतर १५ OTT चॅनेलचा समावेश आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, ५ जी डेटा आणि OTT चे फायदे असणारे रिचार्ज प्लॅन्स कोणकोणते आहे त्यावर एक नजर टाकुयात. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा : स्मार्ट टीव्हीसाठी Twitter लवकरच आणणार ‘हे’ जबरदस्त अ‍ॅप; एलॉन मस्क यांनी केली घोषणा

एअरटेलचा ३५९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि एका महिन्याच्या वैधतेसह दररोजचा २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय वापरकर्त्यांना अपोलो 24|7, हॅलो ट्यून आणि एअरटेल एक्सट्रीम प्ले सारखे फायदे मिळतात. तसेच सोनी लिव्ह, Eros Now, Lionsgate Play आणि १५ पेक्षा अधिक OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळतो.

एअरटेलचा ३९९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

३९९ रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते. त्याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ३ जीबी हाय-स्पीड डेटा कॅपचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये एअरटेल Extreme सह १५ पेक्षा अधिक OTT चॅनलवर मोफत प्रवेश मिळतो.

एअरटेलचा ४९९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

४९९ रूपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ५ जी च्या फायद्यासह ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये समान फायदे देते. तसेच या प्लॅनमध्ये डिस्नी + हॉटस्टार मोबाइलच्या मोफत सबस्क्रिप्शनसह एअरटेल एक्सट्रीम प्ले ऍक्सेस ३ महिन्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि एका महिन्याच्या वैधतेसह ३ जीबी डेटा मिळतो.

एअरटेलचा ६९९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

जर का तुम्ही एका महिन्यापेक्षा जास्त वैधता असणारा प्लॅन शोधात असाल तर तुमच्यासाठी ६९९ रुपयांचा प्लॅन बेस्ट आहे. यामध्य ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएससह दररोज ३ जीबी डेटाचा फायदा मिळतो. वापरकर्त्यांना एअरटेल Extreme आणि ५६ दिवसांचे Amazon प्राईम मेंबरशिपदेखील मोफत मिळते.

हेही वाचा : Airtel ने ५६ व ८४ दिवसांसाठी लॉन्च केले ‘हे’ रिचार्ज प्लॅन, दररोज २ जीबी डेटा आणि…

एअरटेलचा ८३९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

एअरटेलच्या ९९९ रूपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि ५जी इंटरनेटचा फायदा मिळतो. प्लॅनसह मिळणारे OTT फायद्यांविषयी बोलायचे झाल्यास वापरकर्त्यांना ३ महिन्यासाठी Airtel Xtream Play आणि डिस्नी + हॉटस्टार मोबाइलचा मोफत प्रवेश मिळतो.

एअरटेलचा ३,३५९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन

आता जर का तुम्ही एअरटेलचा एक वर्षाचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर एअरटेलचा ३,३५९ रूपयांचा प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे. या प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. तसेच २.५ जीबीचा डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस करता येणार आहे. प्लॅनसह कंपनी ५ जी इंटरनेटचा आनंद घेऊ देते. तसेच एअरटेल डिस्नी + हॉटस्टार मोबाइलचे वार्षिक सबस्क्रिप्शन, अपोलो 24|7 ची मेंबरशिप आणि अन्य OTT चे फायदे देखील मिळतात.