सध्या देशामध्ये Reliance Jio , Airtel आणि vodafone- idea या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. जिओ ही कंपनी सर्वात आघाडीची कंपनी असून त्या पाठोपाठ एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांचा नंबर येतो. टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. या प्लॅनमध्ये १ जीबी डेटापासून ते ३ जीबी डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग असे अनेक फायदे यामध्ये मिळतात. एअरटेल प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, तुम्हाला अधिक डेटा आणि कॉलिंग तसेच मोफत OTT सबस्क्रिप्शन सारखे अनेक अतिरिक्त फायदे मिळतात.

तुम्ही सुद्धा जर का अधिक डेटासह OTT सबस्क्रिप्शनसह असाच प्लान शोधत असाल तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये एअरटेलच्या प्लॅन्सबद्दल आपण जाणून घेऊयात. यामध्ये एका महिन्याची वैधता तसेच ९० दिवसांसाठी Disney+ Hotstar चे मोफत सब्स्क्रिप्शन मिळते.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच

हेही वाचा : Reliance Jio ने लॉन्च केली आणखी २७ शहरांमध्ये ५ जी सेवा; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा आहे समावेश

Airtel चा ३९९ रुपयांचा प्लॅन

तुम्हाला Airtel च्या ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह Disney Plus Hotstar चे मोफत सब्स्क्रिप्शन देखील मिळते. तुम्हाला या प्लॅनमध्ये मोफत Hello Tunes चा अतिरिक्त लाभ देखील मिळेल. तसेच प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज २.५ GB हायस्पीड इंटरनेटसह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच या प्लॅनमध्ये दररोज १०० मोफत एसएमएसही मिळतात. प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी ७० GB इंटरनेट डेटा मिळेल.

एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत Disney + Hotstar चे तीन महिन्यांचे मोबाईल सब्स्क्रिप्शन मिळते. म्हणजेच एका महिन्याच्या रिचार्जमध्ये तुम्ही तीन महिने मोफत OTT चा आनंद घेऊ शकता. च्या रिचार्जमध्ये तुम्ही तीन महिने मोफत OTT चा आनंद घेऊ शकाल. या प्लॅनमध्ये Airtel Xstream मोबाईल सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.इतकेच नव्हे तर प्लॅनसह FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅक देखील मिळत आहे.

हेही वाचा : Airtel च्या ग्राहकांना मोठा धक्का! रिचार्ज प्लॅन महागणार, अध्यक्ष मित्तल म्हणाले “ही दरवाढ…”

Airtel चा ४९९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये वरीलप्रमाणेच सर्व फायदे वापरकर्त्यांना मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. तसेच दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते. या प्लॅनमध्ये एकूण ८४ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला Apollo 24|7 सर्कलचे मोफत सबस्क्रिप्शन आणि Wynk Music वर मोफत प्रवेश देखील मिळतो.

Story img Loader