Airtel 90-Day Recharge Plan: मोबाईल आजच्या जगात प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. उठता बसता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्व जण मोबाईल वापरतात. एका क्षणासाठी सुद्धा आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. आताच्या डिजिटल जगात अनेक कामे मोबाईल अवलंबून असतात. अशात मोबाईलमध्ये रिचार्ज करणे महत्त्वाचे आहे. पण सध्या मोबाईल रिचार्ज खूप महाग झाले आहे त्यामुळे अनेकदा युजर्सना कोणता रिचार्ज करावा, हे कळत नाही. आज आपण एअरटेलचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन जाणून घेणार आहोत. (Airtel recharge plan for 90 days offer unlimited free calling and other benefits check price)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एअरटेल देशातील मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक आहे. एअरटेल त्यांच्या युजर्ससाठी अनेक प्रकारचे नवीन प्लॅन्स आणि ऑफर घेऊन येतो. सध्या कंपनीकडे स्वस्त व महाग असे दोन्ही प्रकारचे प्लॅन उपलब्ध आहे. ग्राहकांना सोयीस्कर पडावे म्हणून रिचार्ज पोर्टफोलिओला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागले आहेत. जर तुम्ही मोठ्या वैधतेच्या प्लॅनचा विचार करत असाल तर आज आपण अशाच एका प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत.

Airtel चा रिचार्ज प्लॅन

एअरटेलनी त्यांच्या ग्राहकांसाठी ९० दिवसांचा मोठा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनची किंमत ९२९ रुपये आहे. जर तुम्ही प्रीपेड रिचार्ज प्लान खरेदी करत असाल तर तुम्ही तीन महिने रिचार्ज करण्यापासून दूर राहू शकता. या ९० दिवसाच्या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कसाठी फ्री अनलिमिटेड कॉलिंग ऑफर सुद्धा दिलेली आहे. ही आताच्या सर्व टेलिकॉम कंपनीच्या रिचार्ज प्लॅनमधील सर्वोत्तम ऑफर आहे.

फ्री अनलिमिटेड कॉलिंगबरोबर प्लॅनमध्ये दररोज १०० डेली एसएमएसचा सुद्धा ऑफर दिलेला आहे. याशिवाय तुम्हाला दररोज १.५ जी डेटा ऑफर दिलेली आहे. एअरटेलचा हा प्लॅन स्पॅम फायटिंग नेटवर्कसह येणार आहे. स्पॅम फायटिंग नेटवर्क हा स्पॅम कॉल आणि एसएमएस ला ओळखून त्यांना ब्लॉक करतो. याशिवाय या प्लॅनमध्ये एक्स्ट्रीम प्ले पर फ्री टिव्ही, कार्यक्रम, चित्रपट आणि लाइव्ह चॅनल्स बघण्याची संधी मिळणार.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel recharge plan for 90 days offer unlimited free calling and other benefits check price ndj