Top recharge plans with OTT subscription : टॉक टाइम, डेटावर आधारित मोबाइल रिचार्ज प्लॅन निवडण्याचे दिवस आता कमी झाले आहेत. कारण आजच्या काळातील युजर्स टॉक टाइम, डेटा नाही तर रिचार्जवर कोणत्या ओटीटी प्लॅटफॉमचे सबस्क्रिप्शन मिळतयं का हे पहिला पाहतो. तर ही बाब लक्षात घेता दूरसंचार कंपन्या नेटफ्लिक्स, डिस्नी प्लस हॉटस्टार आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडीओसारख्या लोकप्रिय ओटीटी (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्मसाठी मोफत सबस्क्रिप्शनसह मोबाइल रिचार्ज प्लॅन्स युजर्ससाठी ऑफर करत आहेत.
तर आज आपण एअरटेल (Airtel) , जिओ, व्हीआय या कंपन्यांच्या प्लॅन्सबद्दल जाणून घेण्यापूर्वी तुमच्या ओटीटी प्लॅन्सबद्दलच्या गरजा कशा आहेत हे समजून घेणंही महत्त्वाचे आहे. जर तुम्ही नवीन रिलीज चित्रपट, सीरियलप्रेमी असाल, ज्यांना नेटफ्लिक्स पाहायला आवडते किंवा तुम्ही डिस्ने+ हॉटस्टार बघत असणारे कुटुंब असाल तर त्या सोयीनुसार तुम्ही पुढील प्लॅन्सची निवड करू शकता. तर अतिरिक्त शुल्क न भरता तुमच्या रिचार्ज प्लॅनसह तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मचा आरामात आनंद घेऊ शकता.
ओटीटी सबस्क्रिप्शनच्या बाबतीत प्रमुख टेलिकॉम कंपन्या कोणते प्लॅन्स ऑफर करतात, चला पाहू…
रिलायन्स जिओ (Reliance Jio) :
जिओ कंपनी टीव्हीच्या सबस्क्रिप्शनसह विविध योजना ऑफर करते. हेवी डेटा वापरकर्ते जिओ फायबर प्लॅन्सची निवड करू शकतात; ज्यांना नेटफ्लिक्ससारखे प्रीमियम ओटीटी सबस्क्रिप्शनवर सिरीज बघायला आवडते. तर मोबाइलसाठी जिओ ओटीटी प्लॅन्स २९९ रुपयांपासून सुरू होतात आणि १,०२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांचे प्राइम व्हिडीओ सबस्क्रिप्शन मिळू शकते.
एअरटेल (Airtel) :
एअरटेल एक्स्ट्रीमच्या सदस्यत्वांसह विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शनसुद्धा देते; ज्यामध्ये ॲमेझॉन प्राइम व्हिडीओसारख्या सबस्क्रिप्शनचा समावेश असू शकतो. या गोष्टी निवडक रिचार्ज प्लॅन्सवर उपलब्ध असतात. एअरटेल हॉटस्टार सबस्क्रिप्शन पॅकेज १९९ रुपयांपासून सुरू होते आणि १,१९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १५० जीबी डेटासह नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिस्नी प्लस हॉटस्टारच्याचा सबस्क्रिप्शन समावेश असतो.
व्हीआय (Vodafone Idea) :
व्हीआय, जिओ टीव्ही आणि एअरटेल एक्स्ट्रीमप्रमाणेच व्हीआय मुव्हीज आणि टीव्हीच्या सबस्क्रिप्शनसह प्लॅन्स ग्राहकांना देते . वोडाफोन नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शनसह १,१९८ आणि १,५९९ प्लॅनमध्ये ऑफर करते.